भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:23 IST2023-01-18T10:23:00+5:302023-01-18T10:23:49+5:30

Crime News : तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिची चुलत बहीण आणि भाओजीने रोशन नावाच्या एका तरूणासोबत तिचं लग्न लावून दिलं होतं. लग्नावेळी तिला माहीत नव्हतं की, तिचा पती पाकिस्तानी आहे.

Kashmiri girl who married with Pakistani boy ran away from home reached Bhopal | भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

भाओजीने न सांगता पाकिस्तानी तरूणासोबत लावून दिलं लग्न, काश्मीरहून पळाली तरूणी आणि....

Crime News : जम्मू-काश्मीरला राहणाऱ्या गंगोत्राला जेव्हा समजलं की, तिचा पती पाकिस्तानी आहे तर ती तिथून पळाली आणि भोपाळला पोहोचली. तिकडे तरूणीच्या कुटुंबियांनी अपहरणाची तक्रार पोलिसात दाखल केली. ज्यानंतर समजलं की, तरूणी भोपाळमध्ये आहे. याची सूचना मध्यप्रदेश पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तरूणी तिच्या मित्रासोबत पोलिसांकडे गेली. तेव्हा पूर्ण कहाणी समोर आली.

तरूणीने पोलिसांना सांगितलं की, तिची चुलत बहीण आणि भाओजीने रोशन नावाच्या एका तरूणासोबत तिचं लग्न लावून दिलं होतं. लग्नावेळी तिला माहीत नव्हतं की, तिचा पती पाकिस्तानी आहे. नंतर जेव्हा तिने पतीच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याला पाकिस्तानी झेंड्यासोबत पाहिलं तर तिला संशय आला. ज्यानंतर तिला समजलं की, ज्या तरूणासोबत तिचं लग्न झालंय तो पाकिस्तानी आहे.

पीडित तरूणीने सांगितलं की, जेव्हा तिला समजलं की, तिचा पती पाकिस्तानी आहे तेव्हा ती कोर्ट मॅरेजबाबत म्हणाली. ज्यासाठी तरूणाकडील लोक तयारही झाले. पण जेव्हा कोर्टात जजने कागदपत्र पाहिली तर त्यांनी लग्नास नकार दिला. कोर्टाने आर्य समाज मंदिरात झालेलं लग्नही बेकायदेशीर ठरवलं.

पतीचा भांडाफोड झाल्यावर तो तरूणीवर अत्याचार करू लागला होता. तो तिला मारहाण करू लागला होता. तरूणीला तिचा पती दुबई किंवा पाकिस्तानला घेऊन जाण्याची तयारी करत होता. त्यानंतर तरूणी संधी पाहून काश्मीरहून पळून भोपाळला पोहोचली. तिथे ती तिच्या मित्रासोबत राहू लागली. तिचा मित्र मनजीत हा सुद्धा पाकिस्तानचा राहणारा आहे. जम्मू-काश्मीरचे पोलीस भोपाळला पोहोचले तिने घरी परत जाण्यास नकार दिला.

Web Title: Kashmiri girl who married with Pakistani boy ran away from home reached Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.