२४ दिवस शोध घेण्याचं नाटक अन् घराच्या अंगणातच पत्नीचा मृतदेह; कर्नाटक हादरवणारा थरार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 19:41 IST2026-02-20T19:38:43+5:302026-02-20T19:41:03+5:30

कर्नाटकात आरोपी पतीने पत्नीही निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह घराच्या अंगणात पुरला होता.

Karnataka Missing Woman Body Found Buried in Her Own Backyard Husband Arrested | २४ दिवस शोध घेण्याचं नाटक अन् घराच्या अंगणातच पत्नीचा मृतदेह; कर्नाटक हादरवणारा थरार उघड

२४ दिवस शोध घेण्याचं नाटक अन् घराच्या अंगणातच पत्नीचा मृतदेह; कर्नाटक हादरवणारा थरार उघड

karnataka Crime:कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात एका कंत्राटदाराने रचलेला केलेलं नाटक अखेर संपुष्टात आलं असून, एक अत्यंत अंगावर काटा आणणारे वास्तव समोर आले आहे. २४ दिवसांपासून पत्नी बेपत्ता असल्याचे सांगून तिचा शोध घेण्याचे नाटक करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानेच आपल्या पत्नीची हत्या करून घराच्या अंगणात तिचा मृतदेह पुरल्याचे उघड झाले आहे.

प्रभू रत्नाकर (४६) असे आरोपी पतीचे नाव असून सरोजिनी (४५) असे मृत पत्नीचे नाव आहे. २४ जानेवारी रोजी प्रभूने सरोजिनीची हत्या केली होती. त्यानंतर त्याने देवरा हिप्परगी पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली की, त्याची पत्नी २४ जानेवारीला खरेदीसाठी बाहेर गेली आणि परतलीच नाही.

असा रचला बनाव

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रभूने एखादा चित्रपट शोभावा असा बनाव रचला. त्याने एक गाडी भाड्याने घेतली आणि पत्नीला शोधण्यासाठी थेट बंगळुरूला गेला. तिथल्या लॉजमध्ये तो मुक्काम करायचा आणि पोलिसांना भासवायचा की तो दिवसभर पत्नीचा शोध घेत आहे. मात्र, पोलिसांना संशय तेव्हा आला जेव्हा त्याच्या गाडीच्या ड्रायव्हरने माहिती दिली की, प्रभू लॉजमधून बाहेरच पडत नाहीये.

पाच फुटांच्या खड्ड्यात दडलेलं रहस्य

पोलिसांना तपासादरम्यान सरोजिनीचा मोबाईल फोन घरातच सापडला, ज्यामुळे प्रभूवरील संशय अधिक बळकट झाला. त्यातच १४ फेब्रुवारी रोजी सरोजिनीच्या आजारी वडिलांचे निधन झाले, पण प्रभू त्यांच्या अंत्यविधीलाही गेला नाही. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हत्येचं कारण ठरलं पैशांचा वाद

प्रभू रत्नाकर हा कर्जात बुडालेला होता आणि त्याच्यावर चेक बाऊन्सचे अनेक गुन्हे दाखल होते. २३ जानेवारीच्या रात्री त्याने सरोजिनीकडे पैसे मागितले. तिने नकार देताच रागाच्या भरात प्रभूने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात प्रहार केला, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा त्यांचा मुलगा पुट्टराजू घरात झोपलेला होता. घराच्या अंगणात झाडे लावण्यासाठी त्याने आधीच खड्डा खणला होता, त्याच ठिकाणी त्याने पत्नीचा मृतदेह गाडून टाकला.

अखेर सत्य समोर आले

घराच्या अंगणातील ५ बाय ३ फुटांच्या जागेतून पोलिसांनी सरोजिनीचा मृतदेह बाहेर काढला. सरोजिनीची आई कमलाव्वा मेलिनमनी यांच्या तक्रारीवरून प्रभू रत्नाकर विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : कर्नाटक: पति का छल उजागर; पत्नी का शव घर में दफन मिला

Web Summary : कर्नाटक में, एक ठेकेदार ने अपनी लापता पत्नी के लिए 24 दिनों तक खोज का नाटक किया, लेकिन उसका पर्दाफाश हो गया। उसने उसकी हत्या कर दी और शव को उनके आंगन में दफना दिया। कर्ज और पुलिस जांच का सामना करते हुए, उसने शुरू में अधिकारियों को गुमराह करने के बाद कबूल किया।

Web Title : Karnataka: Husband's Deceit Unveiled; Wife's Body Found Buried at Home

Web Summary : In Karnataka, a contractor staged a 24-day search for his missing wife, only to be exposed. He murdered her and buried the body in their yard. Facing debt and a police investigation, he confessed after initially misleading authorities.