Kanpur Voilence : बाबा बिर्याणीचा मालक ताब्यात, जफरला रसद पुरवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 20:28 IST2022-06-22T20:27:18+5:302022-06-22T20:28:58+5:30
Kanpur Voilence : एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे.

Kanpur Voilence : बाबा बिर्याणीचा मालक ताब्यात, जफरला रसद पुरवल्याचा आरोप
कानपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी बाबा बिर्याणी या प्रसिद्ध रेस्टॉरंटचा मालक मालक मुख्तार बाबा याला ताब्यात घेतले आहे. मुख्तार बाबाने हिंसाचाराचा मुख्य आरोपी गया जफर हयात हाश्मीला रसद पुरवल्याचा पोलिसांचा दावा आहे. मुख्तार बाबावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लवकरच SIT हिंसाचारातील आणखी आरोपींना अटक करू शकते.
तपास यंत्रणांच्या चौकशीदरम्यान हिंसाचाराचा मास्टरमाइंड जफर हयात हाश्मी याने अनेक मोठी नावे समोर आणली होती. त्यापैकी एक, बाबा बिर्याणीचे नाव क्राउडफंडिंगशी संबंधित होते. बाबा बिर्याणीने दगडफेकीसाठी बोलावलेल्या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आणि पैसे देण्यात मदत केली. एवढेच नाही तर शत्रूची मालमत्ता आणि प्राचीन मंदिराचा काही भाग बळकावून बिर्याणीचे दुकान उघडण्याच्या प्रकरणातही बाबा बिर्याणीचे नाव आले आहे.
काय आहे कानपूर हिंसाचार?
3 जून रोजी कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर गोंधळ झाला होता. दोन समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हिंसाचार झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेक करण्यात आली. येथील दुकाने बंद करण्यावरून वाद झाला. या घटनेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आहे. या प्रकरणात सातत्याने धक्कादायक खुलासे होत आहेत. हिंसाचारात दहशतवाद्यांनी पेट्रोल बॉम्बचाही वापर केला. तपासाअंती असे आढळून आले की, हिंसाचाराच्या आधी पेट्रोल पंपावरून पेट्रोल खरेदी करण्यात आले होते.
वादाची सुरुवात कशी झाली?
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याने वाद सुरू झाला. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या लोकांनी कानपूरमध्ये बाजार बंद पुकारला होता. यादरम्यान दुकाने बंद करण्यावरून गदारोळ झाला, त्यानंतर हिंसाचारही झाला. नंतर भारतीय जनता पक्षाने नुपूर यांची पक्षातून निलंबित केले होते.
57 जणांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे
याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ एफआयआर नोंदवले आहेत. आतापर्यंत ५७ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. मुख्य आरोपी जफर हयात आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी कानपूर कारागृहातून इतर जिल्ह्यातील कारागृहात हलवले आहे.