Video - पत्नी करत होती दागिन्यांची खरेदी, पतीने पटकन तोंडात घातल्या ४ सोन्याच्या नथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:58 IST2025-01-20T15:57:25+5:302025-01-20T15:58:07+5:30
चोर पत्नीसाठी सोन्याची नथ घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आला होता.

फोटो - आजतक
सोने-चांदीच्या दुकानांमध्ये फसवणूक करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सकडून दागिने चोरी करण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. पण कानपूरमध्ये एका चोराने त्याच्या पत्नीसोबत मिळून एका ज्वेलर्सच्या दुकानात इतक्या सफाईने चोरी केली की पाहणारेही आश्चर्यचकित झाले. दुकानदारालाही धक्का बसला. कारण आपल्या पत्नीसाठी नथ घ्यायला आलेल्या चोराने ४ नथ तोंडात टाकल्या. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोर त्याच्या पत्नीसाठी सोन्याची नथ घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आला होता. सत्यम सोनी यांचं श्री साइन ज्वेलर्स नावाचं हे दुकान कानपूरच्या शास्त्री नगर भागात आहे. चोर दुकानात पोहोचला तेव्हा सत्यमची आई दुकानात होती. दुकानात पोहोचताच चोराने पत्नीसाठी सोन्याची नथ दाखवण्यास सांगितलं आणि तो दुकानात बसला.
कानपुर: सोना खरीदने आए चोर ने ज्वेलर्स की दुकान में की चोरी,देखते ही देखते सोना डाला मुंह में।
— Puneet Shukla (@Puneetknpshukla) January 19, 2025
चोर सोना चोरी कर हुआ फरार।
चोरी की वारदात सीसीटीवी कैमरे में हुई कैद।
काकादेव थाना क्षेत्र के शास्त्री नगर बाजार ओम साईं ज्वेलर्स का मामला। @kanpurnagarpol@Uppolice@dgpuppic.twitter.com/iEVAVR6I3G
जेव्हा दुकानातील महिलेने त्याला नथ दाखवायला सुरुवात केली, तेव्हा तोही त्याच्या पत्नीसोबत बसला आणि नथ पाहू लागला. याच दरम्यान पटकन त्याने चार नथ तोंडात टाकल्या. यानंतर त्याने त्याच्या पत्नीसाठी एक नथ खरेदी केली आणि पैसे दिले. पण काही वेळाने जेव्हा सत्यम दुकानात गेला आणि त्याने बॉक्समधील नथ पाहिल्या तेव्हा त्याला ६ नथ कमी आढळल्या.
सत्यमने त्यानंतर दुकानाचं सीसीटीव्ही पाहिलं. ज्यामध्ये चोर नथ चोरताना दिसत होता. यानंतर ज्वेलर्सनी पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीसह तक्रार दाखल केली. एसीपी आयपी सिंह म्हणतात की, एक तरुण ज्वेलर्सच्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने ४ सोन्याच्या नथ चोरल्या. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चोराचा शोधही सुरू करण्यात आला आहे.