'तोंड उघडलं तर तुलाही बाबांसारखं दफन करेन...', मुलीच्या खुलाशानंतर पोलिसही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:49 PM2023-02-04T12:49:47+5:302023-02-04T12:50:07+5:30

Crime News : पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मुलीने हा खुलासा केला. शुक्रवारी उमेशचं पोस्टमार्टम करण्यात आलं. ज्यात त्याचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं. शरीरात अल्कोहोलही आढळून आलं.

Kanpur Umesh murder case mother has threatened her daughter if she speaks | 'तोंड उघडलं तर तुलाही बाबांसारखं दफन करेन...', मुलीच्या खुलाशानंतर पोलिसही झाले हैराण

'तोंड उघडलं तर तुलाही बाबांसारखं दफन करेन...', मुलीच्या खुलाशानंतर पोलिसही झाले हैराण

googlenewsNext

Crime News  : कानपुरच्या बिधनू सनौली गावात पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह घरातच दफन करणाऱ्या महिलेने आपल्या मुलीलाही जीवे मारण्याची धमकी दिली होती. वडिलांना बेशुद्ध पाहून मुलगी जोरजोरात रडत होती, तेव्हा आरोपी आई मुलीला म्हणाली की, याबाबत तोंड उघडलं तर तुलाही बाबांसारखं दफन करेन. ज्यानंतर मुलगी गप्प झाली. नंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मुलीने हा खुलासा केला. शुक्रवारी उमेशचं पोस्टमार्टम करण्यात आलं. ज्यात त्याचा मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचं स्पष्ट झालं. शरीरात अल्कोहोलही आढळून आलं. 

सिरोली गावात राहणारा अॅम्बुलन्स चालक उमेश यादवचं कौशांबी येथे राहणाऱ्या मोनिकासोबत 12 वर्षाआधी लव्ह मॅरेज झालं होतं. उमेश गावातच परिवारापासून काही अंतरावर पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहत होता. गुरूवारी उमेशची आई शिव देवी त्याच्या घरी आली तेव्हा मोनिकाने दरवाजा उघडण्यास नकार दिला. यानंतर आई जेव्हा पोलिसांना घेऊन मुलाच्या घरी पोहोचली तेव्हा त्यांना बेडखाली उमेशचा अर्धा दफन केलेला मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मुलगी रियाने सांगितलं की, बुधवारी मोनिकाने उमेशकडे पगारातील 6 हजार रूपये मागितले होते. उमेशने ते देण्यास नकार दिल्यावर दोघांमध्ये वाद झाला. सायंकाळी उमेश दारू प्यायल्यानंतर बेडवर झोपला. त्यानंतर मोनिकाने त्याचे पाय बांधले आणि त्याच्या छातीवर बसून त्याचा गळा आवळला. 

हे सगळं बघून रिया ओरडायला लागली तेव्हा मोनिकाने तिलाही धमकी दिली. एसीपी दिनेश शुक्ला यांनी सांगितलं की, अटकेपासून वाचण्यासाठी मोनिका आजाराचं नाटक करत होती. मृत उमेशच्या वडिलांच्या तक्रारीनंतर मोनिका विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Kanpur Umesh murder case mother has threatened her daughter if she speaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.