रिवेंज रेपच्या घटनेने उडाली खळबळ, 2 महिलांनी एकमेकींच्या पतीवर लावला बलात्काराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:16 IST2023-02-21T17:15:54+5:302023-02-21T17:16:17+5:30
Crime News : पहिली घटना 18 फेब्रुवारीला नोंदवण्यात आली तर दुसरी घटना 20 फेब्रुवारीला नोंदवून घेण्यात आली.

रिवेंज रेपच्या घटनेने उडाली खळबळ, 2 महिलांनी एकमेकींच्या पतीवर लावला बलात्काराचा आरोप
Crime News : कानपूर (Kanpur) शहरातून एक रिवेंज रेपची खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी एकमेकींच्या पतीवर बलात्कार केल्याच आरोप लावला आहे. पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांची नोंद केली आहे. पहिली घटना 18 फेब्रुवारीला नोंदवण्यात आली तर दुसरी घटना 20 फेब्रुवारीला नोंदवून घेण्यात आली.
सचेंडी भागातील एका महिलेने 18 फेब्रुवारीला आपल्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला होता. ज्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती. तेच नंतर दोन दिवसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या पत्नीनेही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेच्या पतीवर बलात्काराचा आरोप केला.
यानंतर पोलिसांनी हा गुन्हाही 20 फेब्रुवारीला नोंदवून घेतला. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या महिलांनी एकमेकींच्या पतीवर बलात्काराचा आरोप केल्याने सध्या पूर्ण शहरात याच घटनेची चर्चा सुरू आहे. सगळेच या घटनेबाबत कुजबुज करत आहेत.
एसीपी पनकी निशांत शर्मा यांनी सांगितलं की, पोलिसांनी दोन्ही महिलांच्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवली आहे. तसेच दोन्ही महिलांना पोलिसांनी मेडिकल टेस्टसाठी पाठवलं आहे. पोलीस चौकशी करत आहेत. या घटनेमागे त्यांच्यातील वाद समोर आला आहे. एका जुन्या कारणामुळे दोघांनीही एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेडिकल टेस्ट आणि पोलिसांच्या पुढील चौकशीतून पुढील स्थिती स्पष्ट होईल.