धक्कादायक! हुंडा कमी मिळाला म्हणून रागावलेल्या पतीने पत्नीला केलं मित्रांच्या हवाली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 16:04 IST2021-10-11T16:02:58+5:302021-10-11T16:04:13+5:30

UP Crime News : जेव्हा त्याच्या दारोड्या मित्रांनी महिलेसोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तणूक केली तेव्हा तिने भावाला फोन लावला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक लगेच तिच्या घरी आले.

UP : Kannauj women allegation on husband to handed over his drunk friends | धक्कादायक! हुंडा कमी मिळाला म्हणून रागावलेल्या पतीने पत्नीला केलं मित्रांच्या हवाली आणि मग....

धक्कादायक! हुंडा कमी मिळाला म्हणून रागावलेल्या पतीने पत्नीला केलं मित्रांच्या हवाली आणि मग....

उत्तर प्रदेशच्या (UP Crime News) कनौजमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. लग्नात हुंडा मिळाल्याची शित्रा पतीने पत्नीला दिली. दारोड्या पतीने एका पार्टीमध्ये आपल्याच पत्नीला मित्रांच्या हवाली केलं. जेव्हा त्याच्या दारोड्या मित्रांनी महिलेसोबत जबरदस्ती केली आणि गैरवर्तणूक केली तेव्हा तिने भावाला फोन लावला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक लगेच तिच्या घरी आले.

हैराण करणारी बाब म्हणजे महिलेच्या परिवारासोबतही त्यावेळी मारहाण करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नांनंतर महिलेचा परिवार आपल्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाण्यास यशस्वी झाला. पीडित परिवाराने आपल्या जावयाविरोधात आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलिसात तक्रार  दाखल केली. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. तेच आरोपी पती आणि त्याच्या मित्रांचा शोधही घेतला जात आहे. 

पत्नीला मित्रांकडे सोपवलं

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिचा पती नेहमीच दारू पिऊन तिच्यासोबत मारहाण करतो. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती तिला हुंडा कमी मिळाल्यावरून नेहमीच त्रास देतो. शुक्रवारी त्याच्या नीरज आणि अक्षय नावाच्या दोन मित्रांना त्याने घरी बोलवलं होतं. दारू प्यायल्यानंतर पतीने तिला मित्रांच्या हवाली केलं. महिलेने पोलिसांना सांगितलं की, पतीच्या मित्रांनी यावेळी तिच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यानंतर तिने भावाला फोन केला.

हुंडा कमी मिळाल्याने नाराज होता पती

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार महिलेने सांगितलं की, तिचा परिवार जेव्हा तिला वाचवण्यासाठी तिथे पोहोचला तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नांनंतर ती पतीच्या मित्रांच्या जाळ्यातून निसटू शकली. ज्यानंतर शनिवारी सायंकाळी पोलीस पोहोचले. पोलीस अधिकारी प्रशांत वर्मा यांना तिने पूर्ण माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी तिचा पती आणि मित्रांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: UP : Kannauj women allegation on husband to handed over his drunk friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.