कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 09:41 IST2021-02-22T09:39:25+5:302021-02-22T09:41:32+5:30

Crime News : सुवर्णा चिंतामण घोडे असे मयत महिलेचे नाव असून भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण जखमी झाले आहेत.

In Kalyan, three were attacked, a woman was killed and two others were injured | कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

कल्याणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला, महिलेचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

कल्याण : हळदी समारंभ सुरु असल्याचा फायदा उठवत घरात घुसून तिघांवर लोखंडी रॉडने प्राणघातक करण्यात आल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. 

सुवर्णा चिंतामण घोडे असे मयत महिलेचे नाव असून भारती जगदीश म्हात्रे आणि पवन जगदीश म्हात्रे हे दोघेजण जखमी झाले आहेत. दोघांना उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर कोण होते, याचा शोध सुरु असल्याची माहिती खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली. 

दरम्यान, हा प्रकार लुटमारीतून झाला की अन्य काही कारण याचाही तपास सुरु असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.
 

Web Title: In Kalyan, three were attacked, a woman was killed and two others were injured