शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
4
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
5
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
6
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
7
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
8
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
9
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
10
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
11
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
12
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
13
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
14
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
16
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
17
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
18
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
19
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
20
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा

खंडणी प्रकरणातील पत्रकार, बडतर्फ पोलिसांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 16:27 IST

पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आणि एक महिला यांना कोथरुड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती...

ठळक मुद्देसीबीआय किंवा सीआयडीकडे गुन्हा वर्ग करण्याची मागणी

पुणे : मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेऊन खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्या बदल्यात २ कोटी रुपये व रास्ता पेठेतील भुखंड खंडणी स्वरुपात देण्याच्या मागणी प्रकरणात न्यायालयाने पत्रकार, बडतर्फ पोलिसासह तिघांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे़. दरम्यान, यातील महिला आरोपीचे वकील विजयसिंग ठोंबरे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला असून आपण स्वत: पीडित असून बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी हा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा तपास हा पुणेपोलिसांकडून काढून तो सीबीआय अथवा सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.          पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, आणि एक महिला यांना कोथरुड पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. त्यांना बुधवारी सकाळी न्यायालयात हजर केले. या महिलेचे दहावी शिक्षण झाले असताना तिने ज्या करारनाम्यावर फिर्यादीच्या सह्या घेतल्या, तो इंग्रजीमध्ये असून तो कोणाकडून लिहून आणला. या महिलेची इतर आरोपींशी ओळख कशी झाली, याबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. रास्ता पेठ येथील जागेत शैलेश जगताप बसतात.तेथे त्यांचे कार्यालय आहे. जगताप यांच्या घर झडतीत रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. ते त्यांनी कोठून आणले, याचा तपास करायचा आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरुद्ध फसवणूक व अन्य कलमाखाली पुणे शहरात ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच अमोल चव्हाण त्याच्याविरुद्धही ५ गुन्हे दाखल आहेत. या आरोपींच्या मदतीने अन्य दोघा आरोपींना अटक करायची आहे. त्यांनी या गुन्ह्याचा कट कोठे आणि कसा केला.या कटामागील बोलवता धनी कोणी आहे का याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनीन्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

पीडित महिलेच्या वतीने अ‍ॅड. विजयसिंग ठोंबरे यांनी सांगितले की, सुधीर कर्नाटकी हे बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर असून तो खटला मागे घ्यावा,यासाठी प्रयत्नशील आहे.  त्यासाठी त्याने परदेशातून पीडित महिलेला धमक्यासुद्धा दिलेल्या आहेत. या फिर्यादीतील सर्व मजकूर हा खोटा व सुडघेण्याच्या उद्देशाने नमूद केलेला आहे. कर्नाटकी हे १० ते २० बॉडीगार्ड घेऊन बलात्कारासंबंधित खटल्यासाठी येत असे. पीडित केवळ एकट्या होत्या.म्हणून त्यांच्याबरोबर अमोल चव्हाण कोर्टात येत असे. त्या या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही. कर्नाटकी व पीडित महिला २००७ पासून तब्बल १३ वर्षे बरोबर होते. त्याने लग्नाचे आमिष दाखवून छळ केला. एक पीडित असूनही खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे पोलिसांकडून तो काढून घेऊन सीबीआय अथवा सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी आम्ही मागणी केल्याचे अ‍ॅड.ठोंबरे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय