गरीब मुलींना जॉब ऑफर, बलात्कार करून धर्मांतरणासाठी दबाव; २ बहिणींचा 'काळा कारनामा' उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:30 IST2026-02-25T10:28:38+5:302026-02-25T10:30:25+5:30

या प्रकरणात आतापर्यंत अमरीन खान उर्फ माहिरा, आफरीन आणि चंदन यादवसह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरीन आणि चंदन यांची पोलीस चौकशी सुरू आहे

Job offers to poor girls, pressure to convert by raping them; 2 sisters exposed in Madhya Pradesh | गरीब मुलींना जॉब ऑफर, बलात्कार करून धर्मांतरणासाठी दबाव; २ बहिणींचा 'काळा कारनामा' उघड

गरीब मुलींना जॉब ऑफर, बलात्कार करून धर्मांतरणासाठी दबाव; २ बहिणींचा 'काळा कारनामा' उघड

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये कथित धर्म परिवर्तन आणि लैंगिक शोषणाशी निगडित एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. ही  टोळी अमरीन आणि आफरीन नावाच्या दोन बहिणी चालवत होत्या. गरीब कुटुंबातील मुलींवर आमिष दाखवून त्यांना बोलावून घ्यायचे आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करून ब्लॅकमेल करण्याचं काम या दोघी करत होत्या. २ महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या दोघींविरोधात गुन्हा नोंद केला.

या प्रकरणात आतापर्यंत अमरीन खान उर्फ माहिरा, आफरीन आणि चंदन यादवसह ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमरीन आणि चंदन यांची पोलीस चौकशी सुरू आहे. तर फरार आरोपी यासिर, बिलाल आणि चानूचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेबाबत दोन वेगवेगळ्या एफआयआर पोलिसांनी नोंदवल्या आहेत. यातील पहिली पीडिता हिने पोलिसांना तक्रार केली. त्यात म्हटलंय की, मी एक विधवा असून दोन मुलांची जबाबदारी एकटी सांभाळत होती. मी कॅटरिंग व्यवसायात वेटरचे काम करायची. २०२३ साली एका मॉलमध्ये माझी ओळख अमरीनसोबत झाली. जिने १० हजारांच्या सॅलरीवर मला मुलांचा सांभाळ करण्याची नोकरी ऑफर केली. त्यानंतर तिने मला अशोका गार्डन इथल्या घरी ठेवले. तिथून सागर रॉयल विला इथेही बोलावले. याठिकाणी अमरीन तिचा साथीदार चंदनसोबत राहत होती. 

डिसेंबर २०२४ मध्ये मला नारायण नगर इथल्या चंदनच्या बहिणीच्या घरी नेण्यात आले. तिथे चहामध्ये नशेचे औषध मिसळून माझ्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर मला बदनाम करण्याची आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गप्प करण्यात आले. या आरोपींनी माझ्यावर धर्म परिवर्तनासाठीही दबाव टाकला. नमाज पठण करणे आणि बुरखा घालण्यासाठी मजबूर केले असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पोलिसांच्या तपासात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला. दुसऱ्या एका मुलीसोबतही अशीच घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे आली. तिच्यावरही बलात्कार करण्यात आला होता. 

दरम्यान, या दोन्ही महिलांची फसवणूक एकप्रकारे झाल्याचे पोलिसांना कळले. त्यामुळे या गुन्ह्यामागे एका टोळीचा हात असावा असा संशय पोलिसांना आला. तपासात दोन्ही बहिणी राहत असलेल्या फ्टॅट परिसरात चौकशी केली असता शेजाऱ्यांना कुठलीही संशयास्पद हालचाल दिसली नसल्याचे समोर आले. पोलीस आता आरोपी नेटवर्क, संभाव्य आणखी पीडिता शोधण्याचे काम आणि पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे. पीडितांच्या जबाबानंतर मेडिकल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट जमा केले जात आहेत. फरार आरोपीच्या शोधासाठी काही पथके नेमण्यात आली आहेत. 

Web Title : गरीब महिलाओं को नौकरी का झांसा देकर धर्मांतरण और बलात्कार: बहनों का रैकेट

Web Summary : भोपाल में, दो बहनों ने गरीब महिलाओं को नौकरी का लालच देकर यौन उत्पीड़न किया और धर्म परिवर्तन के लिए दबाव डाला। बलात्कार और जबरन धर्म परिवर्तन की शिकायतों के बाद पुलिस ने बहनों सहित चार लोगों को गिरफ्तार किया। अन्य संदिग्धों और संभावित पीड़ितों की तलाश जारी है।

Web Title : Sisters ran sex, conversion racket, targeting poor women with job offers.

Web Summary : In Bhopal, two sisters lured poor women with jobs, then sexually assaulted and pressured them to convert. Police arrested four, including the sisters, after complaints of rape and forced conversion surfaced. Investigation continues to find the other suspects and potential victims.