शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण : सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 7:06 PM

या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे व या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. 

ठळक मुद्देबंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले.एका फेसबुक पोस्टवरून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आले आणि तिथे त्यांना मारहाण करण्यात आली.

मुंबई - राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या मारहाण प्रकरणी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानेपोलिसांना दिले. पीडित अनंत करमुसे याने या मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना आरोपी करावे व या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. 

या याचिकेवरील सुनावणी न्या. गिरीश कुलकर्णी यांच्यासमोर होती. आव्हाड, त्यांचे अज्ञात समर्थक व पोलिसांविरुद्ध अपहरण, मारहाणीप्रकरणी ८ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविला. एका फेसबुक पोस्टवरून आव्हाड यांच्या बंगल्यावर नेण्यात आले आणि तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली. करमुसे यांच्या म्हणण्यानुसार, ५ एप्रिल रोजी त्याच्या घरी पोलीस आले आणि त्याला पोलीस ठाण्यात जायचे, असे सांगण्यात आले. पण त्याऐवजी त्याला आव्हाड यांच्या बंगल्यात नेण्यात आले. तिथे त्यांना १० ते १५ माणसांनी मारले.

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार? निलंबनाची मागणी

Jitendra Awhad: आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरणी पोलिसांची कारवाई; ५ जणांना अटक

 

Jitendra Awhad : अभियंता मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना बेड्या

 

आव्हाड यांचे मॉर्फ फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली आणि हे घडत असताना स्वतः आव्हाड उपस्थित होते. मात्र, आव्हाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. न्या. कुलकर्णी यांनी पोलिसांना आव्हाड यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन ते ठाणे दंडाधिकाऱ्यांपुढे बंद लिफाफ्यात सादर करण्याचे निर्देश दिले. यावर न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी ठेवली. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसcctvसीसीटीव्ही