शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

बापरे! मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड; सापडलं कोट्यवधींचं घबाड, अधिकारी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 09:52 IST

Pankaj Mishra : हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले.

नवी दिल्ली - झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय पंकज मिश्रा यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिश्रा यांच्या संबंधित मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापे टाकले. एकूण 18 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. साहिबगंज जिल्ह्यातील बरहेट आणि राजमलमध्ये धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये कोट्यवधी रुपयांची कॅश आणि इतरही अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

पंकज मिश्रा यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. खाण घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच मिश्रा यांचे निकटवर्तीय असलेल्या हिरा भगत यांच्या घरावरदेखील छापा टाकण्यात आला. भगत यांच्या घरात ईडीला घबाड सापडलं. बराच वेळ पैशांची मोजदाद सुरू होती. ईडीनं हस्तगत केलेल्या नोटांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ईडीनं एकूण पाच कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळत आहे. 

भाजपाचे खासदार डॉ. निशिकांत दुबे यांनी ईडीने केलेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि पंकज मिश्रा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांची इमानदारी आज समोर आली आहे. ईडीने केलेल्या छापेमारीत पंकज मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांकडे पाच कोटींहून अधिक रोख रक्कम आणि कोट्यवधींचीं संपत्ती मिळाली, आणखी किती लूटणार? असं दुबे यांनी म्हटलं आहे. 

5 कोटी रोख रकमेशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रेही सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, ईडीकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, शुक्रवारी ईडीच्या पथकाने पंकज मिश्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले होते. पंकज मिश्रा यांची उत्तराखंडमध्ये चौकशी केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांची सुटका केली. या प्रकरणात ईडीच्या पथकाने आतापर्यंत 5 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. ईडीने ज्या लोकांवर छापे टाकले आहेत त्यांना रांचीला बोलावण्यात आले असून ईडी त्यांची रांचीमध्ये चौकशी करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंडCrime Newsगुन्हेगारी