शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर 'ईडी'ची कारवाई, अनेक ठिकाणी छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 11:03 IST

Jharkhand CM Hemant Soren, ED Raids: ज्या लोकांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jharkhand CM Hemant Soren, ED Raids: झारखंडचेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. त्यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या अशा अनेक व्यावसायिकांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने अनेक व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. हे छापे अजूनही सुरू आहेत. ईडी अर्धा डझनहून अधिक ठिकाणी छापे टाकत आहे. ज्या लोकांवर छापे टाकले जात आहेत, त्यांचे राजकीय वर्तुळात चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर खाणकाम, मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी रांचीसह राजस्थानमधील दहाहून अधिक ठिकाणी छापेमारी करत आहे. सीएम सोरेन यांचे मीडिया सल्लागार अभिषेक प्रसाद यांचेही नाव यामध्ये आहे, त्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. हजारीबागचे डीएसपी राजेंद्र दुबे आणि साहिबगंजचे जिल्हा दंडाधिकारी राम निवास यांच्या आवारातही छापे टाकले जात आहेत.

राजस्थानमधील राम निवासच्या निवासस्थानाचीही झडती घेण्यात येत आहे. यासोबतच विनोद कुमार नावाच्या आरोपीच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. रोशन खोडनिया भाई, पिस्का मोड, रातू रोड, रांची, देवघरचे माजी आमदार पप्पू यादव, अभय सरोगी, कोलकाता येथील अवधेश कुणार यांच्या घरांचीही ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत. या सर्वांवर अटकेची टांगती तलवार आहे. हे सर्व लोक सीएम हेमंत सोरेन यांच्या जवळचे मानले जातात.

'ईडी आणि सीबीआयचा गैरवापर होत आहे'

दुसरीकडे ईडीच्या या कारवाईवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते उदित राज म्हणतात की सरकार विरोधकांच्या विरोधात ईडीचा वापर करत आहे. ते म्हणाले की, झारखंडचेमुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जवळच्या लोकांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत, तर छत्तीसगड निवडणुकीदरम्यानही भूपेश बघेल यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. भाजप निवडणूक जिंकण्यासाठी काहीही करू शकते, ते ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंडChief Ministerमुख्यमंत्रीraidधाड