गर्लफ्रेन्डच्या कमी उंचीवरून लोक मारत होते टोमणे, प्रियकराने कुऱ्हाडीने गळा कापत केली तिची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 10:47 IST2021-10-11T10:46:54+5:302021-10-11T10:47:35+5:30

Jharkhand Crime News : पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितलं की, ही घटना ५ ऑक्टोबर २०२१ ची आहे. खूंटी जिल्ह्यातील नेयलडीह जंगलात २० वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता.

Jharkhand Crime News : Man murder girlfriend due to her small height | गर्लफ्रेन्डच्या कमी उंचीवरून लोक मारत होते टोमणे, प्रियकराने कुऱ्हाडीने गळा कापत केली तिची हत्या

गर्लफ्रेन्डच्या कमी उंचीवरून लोक मारत होते टोमणे, प्रियकराने कुऱ्हाडीने गळा कापत केली तिची हत्या

झारखंडमधून (Jharkhand) विचित्र कारणामुळे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खूंटी जिल्ह्यात एका प्रियकराने केवळ या कारणाने प्रेयसीची हत्या केली कारण तिची उंची कमी होती. गावातील लोक आणि ओळखीचे लोक यावरून टोमणे मारत होते आणि प्रेयसी प्रियकरावर सतत लग्नासाठी दबाव टाकत होती. यानंतर प्रियकर अजीतने प्रेयसीची धारदार शस्त्राने गळा (Jharkhand Crime News) चिरून हत्या केली.

पोलीस अधिकारी अमित कुमार यांनी सांगितलं की, ही घटना ५ ऑक्टोबर २०२१ ची आहे. खूंटी जिल्ह्यातील नेयलडीह जंगलात २० वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यावर ६ ऑक्टोबरला तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांची ओळख पटवली. तिचं नाव अंजली तिर्की आहे.

पोलिसांनी सांगितलं की, अजीतने त्याच्या प्रेयसीला जीवे मारलं कारण अंजलीचं लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. तर गावातील लोक प्रियकर अजीतला गावातील लोक प्रेयसीच्या कमी उंचीवरून टोमणे मारत होते. लोक त्याला टोमणे मारत होते की, तु बुटकीसोबत लग्न करणार. यामुळे तो संतापला होता. त्याने प्रेयसीला खूंटी जंगलात बोलवलं आणि तिथे दोघे बराचवेळ थांबले. त्यानंतर अजीतने प्रेयसीच्या बॅगमधील तिचे सगळे कपडे बाहेर काढले आणि जाळले. प्रेयसीने विचारलं की, असं का केलं? तर त्याने नवीन घेऊन देतो असं सांगितलं. त्यानंतर त्याने क कुऱ्हाडीने वार करत तिचा गळा कापला. त्यानंतर अजीत फरार झाला.

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आल्यावर पोलिसांनी छापे मारले आणि मृत तरूणी अंजलीचा प्रियकर अजीत याला त्याच्या दुन्दू दरहाटोली गावातून अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड, मृतक तरूणीचा मोबाईल आणि आरोपीचा मोबाइल ताब्यात घेतला. 
 

Web Title: Jharkhand Crime News : Man murder girlfriend due to her small height