शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

Jharkhand Crime News: रांचीनंतर गुमलामध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; पशू तस्कर फरार, 41 गाईंची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 13:35 IST

Jharkhand Crime News: रांचीमध्ये महिला एसआयला चिरडून ठार केल्याची घटना शांत होत नव्हती तोच आता गुमला येथेही तशाच प्रकारची घटना घडली आहे.

गुमला: रांचीमध्ये महिला एसआयला चिरडून ठार केल्याची घटना शांत होत नव्हती तोच आता गुमला येथेही तशाच प्रकारची घटना घडली आहे. गुरे तस्करांनी रायडीहमध्ये पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपींनी पोलिस ठाण्याजवळील अडथळा तोडून पळ काढला. यामध्ये एएसआय प्रसिद्ध तिवारी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून प्राणी तस्करांची दोन वाहने पकडली, पण तस्कर पळून जाण्यात यशस्वी झाले.

संबंधित बातमी- 'वर्दी'ला चिरडले! गेल्या 24 तासात ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची चिरडून हत्या

पोलिसांना वाहनातून 41 गोवंश जनावरे सापडली आहेत. या प्रकरणाची माहिती देताना रायडीह पोलिस स्टेशनचे प्रभारी अमित कुमार म्हणाले की, गुमला एसपी एहतेशाम वकारीब यांना छत्तीसगड मार्गे वाहनांमधून प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पहाटे तीन वाजता पोलिसांचे पथक शंख मोड मांढटोली येथे तस्करांच्या वाहनांची वाट पाहू लागले. इकडे टेक्निकल सेल चालकाचा मोबाईल नंबरही ट्रेस करत होता. दरम्यान मालवाहू ट्रक व बोलेरो येताना दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र चालकाने वेग वाढवून पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

ट्रक उभी करून चालक फरार सुदैवाने ते तात्काळ घटनास्थळावरुन बाजुला झाल्याने मोठी दुर्घटना टळली. यानंतर पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या गेटजवळ गतिरोधक लावले आणि इतर पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपींचा पाठलाग सुरू झाला. पोलीस ठाण्याच्या तीनशे मीटर अगोदरच खीराखंड वळणावर बोलेरो ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कोसळली. त्यानंतर चालक पळून गेला. पोलिस ठाण्याच्या गेटजवळ पुन्हा ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो अडथळा तोडून पुढे गेला. मात्र पोलिसांचा पाठपुरावा सुरूच होता. यावर चालकाने ट्रक सिलम बायपासजवळ उभा करून पळ काढला.

वाहनातून 41 गोवंश जनावरे जप्त पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. यामध्ये 41 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून ती सर्व गावकऱ्यांमध्ये वाटण्यात आली. तर जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी रायडीह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच तस्करांना अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंडPoliceपोलिस