दादरमध्ये रानडे रोडवरील सराफाच्या दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 20:58 IST2019-01-02T20:57:43+5:302019-01-02T20:58:08+5:30

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल ज्वेलर्समधून १ ते २ किलो सोनं चोरीस गेलं असून दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु आहे. 

The jewelery shop on Ranade Road in Dadar was attacked by thieves | दादरमध्ये रानडे रोडवरील सराफाच्या दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला

दादरमध्ये रानडे रोडवरील सराफाच्या दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला

मुंबई - गजबजलेल्या दादर परिसरातील पश्चिमेकडील रानडे रोडवर असलेल्या अनिल ज्वेलर्स नावाच्या सराफाच्या दुकानात काल रात्री चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अडीज लाखांचा माल चोरीस गेल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल ज्वेलर्समधून १ ते २ किलो सोनं चोरीस गेलं असून दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु आहे. 

बुधवारी सकाळी अनिल ज्वेलर्सचे शटर उघडले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. प्रजापती राजाराम ऍण्ड सन्स हे पुंड्या आणि माठाचे दुकान अनिल ज्वेलर्सच्या दुकानाला लागूनच आहे. पुंडय़ांच्या दुकानाच्या भिंतीला होल पाडून चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात घुसले. मग त्यांनी दीड ते दोन किलो सोने आणि अडीच लाखांची रोकड घेऊन आल्यामार्गे पळ काढला असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतल्यानंतर आरोपी दुकानाच्या मागच्या बाजूला असलेल्या शाळेच्या दिशेने पळून गेल्याचे श्वानाच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींची हालचाल कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.



 

Web Title: The jewelery shop on Ranade Road in Dadar was attacked by thieves