पुलंच्याच घरी चोरी करणारा जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 01:01 IST2018-12-23T01:01:25+5:302018-12-23T01:01:34+5:30

घरफोड्यांच्या शिकलगार टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीचाही यात समावेश आहे.

Jeriband steals at the house of Purna | पुलंच्याच घरी चोरी करणारा जेरबंद

पुलंच्याच घरी चोरी करणारा जेरबंद

पुणे : घरफोड्यांच्या शिकलगार टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या घरी चोरी करणाऱ्या आरोपीचाही यात समावेश आहे. घरफोडीचे १९ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. सोन्याचे दागिने व चारचाकी मोटारी, असा २१ लाखांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
करणसिंग दुधानी (वय २०), बेन्तूसिंग कल्याणी (वय २८), उद्धलसिंग राजुसिंग ऊर्फ जम्बोसिंग दुधाणी (वय २८, सर्व रा. रामटेकडी), चोरीचा ऐवज स्वीकारणारे रोहन प्रकाश कांबळे (वय २१), रियाज सय्यद (वय ३७) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील करणसिंग याने पुलंच्या घरी चोरी केली होती. आरोपींबाबत माहिती मिळताच रामटेकडी परिसरात कोंबिंग आॅपरेशन राबविले. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख रुपयांचे ३५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून अन्य गुन्ह्यांमधील चोरीच्या मोटारी व दुचाकी ताब्यात घेतली आहे. करणसिंग हा लोणावळा पोलिसांच्या मोक्काच्या गुन्ह्यात फरार आहे. तर, उद्धलसिंगने डिसेंबर २०१७ मध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी रामचंद्र घुगे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला होता.

Web Title: Jeriband steals at the house of Purna