शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 13:29 IST2024-12-03T13:28:55+5:302024-12-03T13:29:38+5:30
घटनेबाबत स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

शौक बड़ी चीज है! स्ट्रेस असायचा तेव्हा 'तो' लोकांच्या घरात घुसायचा; १००० वेळा केलं असं काही....
जपानमधील ३७ वर्षीय व्यक्तीला फुकुओका प्रांतातील दाजाइफू शहरात २५ नोव्हेंबर २०२४ रोजी एका माणसाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर अटक करण्यात आली. जेव्हा घराचा मालक आणि त्याच्या पत्नीने त्याला पाहिलं तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर या व्यक्तीला अटक करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने सांगितलं की, घर फोडणं हा त्याचा छंद असून आतापर्यंत त्याने १००० हून अधिक घरात चोरी केली आहे. "माझ्यासाठी ही रोमांचकारी घटना असते. मी पकडला जाईन की नाही याचा विचार करताना माझ्या हाताला घाम फुटतो आणि त्यामुळे मला स्ट्रेसपासून मुक्ती मिळते" असं चोरी करण्यासाठी घरात घुसणारा माणूस म्हणाला.
आतापर्यंत एकाही घरातून चोरी झाल्याची तक्रार आली नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. या घटनेबाबत स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसल्याचं यातून दिसून आलं आहे. याआधी देखील अशा विचित्र घटना घडल्या आहेत.
जपानमध्ये आणखी एक विचित्र घटना समोर आली, ज्यामध्ये एका मुलीने आत्महत्या केली आणि त्यामुळे आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. ३१ ऑगस्ट २०२४ रोजी जपानमधील योकोहामा शहरातील न्यूमन शॉपिंग मॉलमधून १७ वर्षीय मुलीने उडी मारून आत्महत्या केली आणि ती चिकाको चिबा नावाच्या महिलेच्या अंगावर पडली. दोघींनाही रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र नंतर दोघींचा मृत्यू झाला.