गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 01:17 IST2025-07-06T01:15:56+5:302025-07-06T01:17:56+5:30

हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे...

Jangur Baba arrested for converting non-Muslims, used to trap girls in love trap | गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

यूपी एटीएसने जलालुद्दीन उर्फ ​​झांगूर बाबा आणि त्याची महिला सहकारी नीतू उर्फ ​​नसरीन यांना अटक केली, यांच्यावर गैर-मुस्लिम गरीब, असहाय्य आणि गरजू लोकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याचा आरोप आहे. झांगूरवर ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. झांगूर बाबा आणि त्याच्या टोळीने परदेशी निधीतून एका वर्षात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवली आहे. त्यांनी मोठे शोरूम, बंगले आणि आलिशान गाड्या खरेदी केल्या. झांगूर बाबा आणि त्याच्या साथीदारांनी स्वतःच्या आणि त्यांच्या संस्थांच्या नावावर विविध बँकांमध्ये ४० खाती उघडली आहेत. यांत आतापर्यंत १०० कोटी रुपयांपेक्षाही अधिकचा व्यवहार झाला आहे. हे लोक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करायचे. झांगूर आणि नसरीनसह टोळीतील इतर सदस्यांच्या कृत्यांबद्दल एटीएस अधिक माहिती गोळा करत आहे.

लखनौमध्ये तीन दिवसांपूर्वी, झांगूरच्या तावडीत अडकल्यानंतर धर्मांतर करणाऱ्यांनी, पुन्हा आपला मुळचा धर्म स्वीकारला. दरम्यान, पीडित लोकांनी विविध प्रकारचे धक्कादायक खुलासेही केले. यानंतर, एटीएसने झांगूर बाबाच्या शोधाला अधिक गती दिली होती. गेल्या वर्षी एटीएसने झांगूर बाबांविरुद्ध धर्मांतर प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक तथा सांप्रदायिकतेअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. 

झांगूर बाबा आणि नसरीन हे मूळचे बलरामपूरमधील माधपूर उत्तरौला येथील रहिवासी आहेत. ते सापडत नसल्याने त्यांच्यावर बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. झांगूर बऱ्याच काळापासून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत होता आणि त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होता. यासाठी तो आणि त्याचे इतर सहकारी तरुण-तरुणींना विविध प्रकारची प्रलोभनेही देत होते.

एटीएसच्या म्हणण्यानुसार, संबंधित दोन्ही आरोपी विधवा महिलांना आमिष दाखवून, त्यांना आर्थिक मदत देऊन आणि त्यांचे लग्न करून देण्याचे आश्वासन देत त्यांना फसवत असत. एवढेच नाही तर, या लोकांनी अनेक असहाय्य लोकांना धमक्या देऊन त्यांचे धर्मांतरण केले आहे, असे अनेक पीडित लोकांनी म्हटले आहे.

झांगूरचा मुलगा आणि सहकारी एप्रिलमध्ये पकडले गेले -
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, झांगूर बाबा हा धर्मांतरात सहभागी असलेल्या या टोळीचा प्रमुख आहे. त्याचा मुलगा मेहबूब देखील त्याच्यासोबत या कामात सहभागी होता. मेहबूब आणि त्याचा साथीदार नवीन उर्फ ​​जमालुद्दीन यांना या वर्षी ८ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. दोघेही लखनऊ तुरुंगात आहेत. दोघांनीही धर्मांतरात मदत करणाऱ्या त्यांच्या अनेक साथीदारांची नावे उघड केली आहेत. एटीएस त्यांचाही शोध घेत आहे.

Web Title: Jangur Baba arrested for converting non-Muslims, used to trap girls in love trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.