प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 14:10 IST2025-09-13T14:10:10+5:302025-09-13T14:10:38+5:30

स्नेहाने हे धक्कादायक पाऊल का उचलले याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेबाबत पती शुभम सिंहला कळवण्यात आले

Jamshedpur: woman Sneha Kumari who got married before 6 months dies of burns, family dispute exposed | प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

झारखंडच्या जमशेदपूर येथे शनिवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी २४ वर्षीय स्नेहा कुमारने भाड्याने राहत असलेल्या खोलीत स्वत:ला आग लावून आत्महत्या केली आहे. या घटनेत स्नेहा ८० टक्क्याहून अधिक भाजली आहे. आगीच्या घटनेनंतर शेजाऱ्यांनी कसंबसं स्नेहा वाचवत हॉस्पिटलला दाखल केले. मात्र स्नेहा तब्येत नाजूक असल्याने तिला टीएमएच रुग्णालयात नेण्यात आले परंतु वाटेतच तिने जीव सोडला. 

स्नेहा धनबादची राहणारी होती. ६ महिन्यापूर्वी शुभम सिंह नावाच्या युवकासोबत तिने लव्ह मॅरेज केले होते. तिचा पती ट्रान्सपोर्टचं काम करायचा. या घटनेच्या वेळी तो रांची येथे एका कामासाठी गेला होता. शेजारी जितेंद्र सिंह म्हणाले की, पती-पत्नी यांच्यात कायम छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होत असायचा. त्यातूनच कदाचित स्नेहाने हे टोकाचे पाऊल उचललं असावे. रात्री उशिरा तिने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी पंचनामा करून आसपासच्या लोकांचीही चौकशी केली. 

स्नेहाने हे धक्कादायक पाऊल का उचलले याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेबाबत पती शुभम सिंहला कळवण्यात आले. तो रांचीहून जमशेदपूरसाठी रवाना झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या आदल्या रात्री घरातून कुठलाही वाद ऐकायला आला नव्हता. जेव्हा या घरातून धूर निघू लागला तेव्हा आसपासच्या लोकांनी धावत येऊन दरवाजा तोडला. तेव्हा आगीच्या झळा इतक्या होत्या की स्नेहाला वाचवणे कठीण होते असं इथल्या घरमालकाने पोलिसांना सांगितले. 

दरम्यान, झारखंडमध्ये अलीकडच्या दिवसांत अशा घटना वाढल्याचं दिसून येत आहे. काही महिन्यांपूर्वी रामगड येथील सोनाली कुमार नावाच्या युवतीने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या प्रकरणातही प्रेम आणि दबाव हे अँगल समोर आले होते. 

Web Title: Jamshedpur: woman Sneha Kumari who got married before 6 months dies of burns, family dispute exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.