शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

...म्हणून भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 11:34 IST

Jammu and Kashmir 2 BJP leaders arrested for faking militant attack : कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीर पोलिसांनी (Jammu Kashmir Police) भाजपाच्या (BJP) दोन पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात यावी या हेतूने या दोघांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इश्फाक अहमद मीर असं अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचं नाव असून तो कुपवाडा येथील भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. पक्षाचे जिल्हा प्रवक्ते बशरत अहमद आणि आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने इश्फाक यांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केला. भाजपाने इश्फाकचे वडील मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन निलंबित केल्याचं सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाजपाचे कुपवारा जिल्हाध्यक्ष असणाऱ्या मोहम्मद शाफी मीर यांना पदावरुन हटवण्यात आल्याचं भाजपाने म्हटलं आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला एक दोन दिवसांमध्ये मिळेल. इश्फाकवर 16 जुलै रोजी हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं होतं. गुलगाम गावामध्ये मदत साहित्याचं वाटप करताना हल्ला झाल्याचं सांगण्यात आलं. या हल्ल्यामध्ये माझ्या हाताला गोळी लागल्याने मी जखमी झाल्याचंही इश्फाकने म्हटलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि हा दहशतवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं. दहशतवाद्यांना प्रतिउत्तर देताना इश्फाकच्या सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या बंदुकीमधून चूकून सुटलेल्या गोळीमुळे तो जखमी झाल्याचं सांगण्यात आलं. 

पोलिसांनी चौकशी केली असता इश्फाक, बशरत आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी बनाव केल्याचं समोर आलं. पोलिसांकडून आपल्याला सुरक्षा मिळावी या हेतूने आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव या भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकांची कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला. तसेच पक्षाच्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी त्यांनी खोटी माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliceपोलिसArrestअटकTerror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीर