शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

जळगाव : जबरी लुटीच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेलल्या आरोपीचा खून, संशयावरून एक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 8:12 AM

गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी सत्या याने शाहू नगरात मुजाहील शेख इब्राहीम (२१) या टपरीचालकावर चाकू हल्ला केला होता. बंद केलेली टपरी परत उघडून सिगारेट देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाला होता. यात सत्या याला अटक झाली होती.

जळगाव - बंद केलेली टपरी परत उघडून सिगारेट देण्यास नकार देणाऱ्या टपरी चालकावर चाकू हल्ला केल्याच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेलल्या शेख अल्तमस शेख शकील उर्फ सत्या (१९) याचा शाहू नगरातील जळके मीलच्या आवारात खून झाल्याची घटना रविवारी रात्री साडे नऊ वाजता उघडकीस आली. दरम्यान, खुनाचे कारण उशिरापर्यंत स्पष्ट झालेले नसले तरी संशयावरुन एकालापोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहू नगरातील जळके मीलच्या पडक्या खोल्यांमध्ये सत्या मृतावस्थेत असल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने त्याचा चुलत भाऊ ऐहतेश्याम मुश्ताक शेख याला दिली. त्याने तातडीने सत्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. त्याच्या डोक्यात फरशीचा तुकडा मारल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता टपरी चालकाशी झालेल्या वादातून ही घटना घडली असावी, अशी माहीती नातेवाईकांनी त्यांना दिली. गेल्या दहा ते बारा दिवसापूर्वी सत्या याने शाहू नगरात मुजाहील शेख इब्राहीम (२१) या टपरीचालकावर चाकू हल्ला केला होता. बंद केलेली टपरी परत उघडून सिगारेट देण्यास नकार दिल्याने हा हल्ला झाला होता. यात सत्या याला अटक झाली होती. न्यायालयाने त्याचा नुकताच जामीन केला. तीन दिवसापूर्वीच काही जणांनी घरी येऊन सत्याला धमकी दिली होती, त्यामुळे त्या तिघांनीच त्याला मारले असावे, असा संशय ऐहतेश्याम मुश्ताक शेख याने पोलिसांना माहिती देतांना व्यक्त केला. या संशयावरुन पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :MurderखूनJalgaonजळगावPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे