शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

माणुसकीला काळीमा! चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 1:58 PM

Crime News : चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पीडितेला बोलावून घेत तक्रार दाखल करुन घेतली आणि याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. ही घटना 6 महिन्यांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात असून वेगवेगळ्या तीन कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार आणि मारहाण करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये चालत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओबद्दल जेव्हा जयपूर पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा त्यांनी याचा अधिक तपास सुरू केला. व्हिडीओमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार होत असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांना व्हिडीओमधील आवाज हा जयपूरमधील लोकांसोबत मिळताजुळता वाटला. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सीएसटी तसंच शरहातील 4 जिल्ह्यांमधील पोलिसांना तपासासाठी आणि व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवण्याचं काम दिलं. यातील पीडिता ही उत्तर प्रदेशमधील असल्याचं स्पष्ट झालं, यानंतर पोलिसांनी महिलेला जयपूरमध्ये बोलावून मानसरोवर ठाण्यात तक्रार दाखल करुन घेतली आहे. 

पीडितेनं तक्रार दाखल करताना दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑक्टोबर 2020 रोजी ती न्यू सांगानेर रोडजवळील साई कृपा हॉटेलमध्ये थांबली होती. यादरम्यान महिलाच्या ओळखीच्या संजू बंगाली नावाच्या व्यक्तीने तिला पैशाचं आमिष देत एका मुलासोबत पाठवलं. या मुलाने महिलेला एका कारमध्ये बसवलं. यात आधीपासून इतर चारजण होते. कारमधील व्यक्तींनी महिलेचा मोबाईल काढून घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेदरम्यान कारमधील अन्य दोघांनी महिलेचा व्हिडीओ बनवला. दरम्यान अन्य 2 कारही तिथे आल्या आणि दुसऱ्या कारमध्ये घेऊन जात महिलेवर अत्याचार केला. घटनेत तब्बल 12 लोक सहभागी असल्याचं म्हटलं आहे.

पीडितेने ती गुलाब आणि अभिषेक नावाच्या व्यक्तीला ओळखते. गुलाबनं पीडितेला धमकी दिली होती, की याबद्दल कोणालाही सांगितलं, तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेल. याच कारणामुळे सहा महिने होऊन गेले तरीही पीडितेनं याप्रकरणाची तक्रार केली नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात चार डीसीपींसह सुमारे 10 आयपीएस आणि 40 सीआयची टीम तयार करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अजयपाल लांबाने यांनी दिली. या पथकात पीडित आणि आरोपींचा सुमारे 100 पोलीस शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही गँग अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्याचं काम करते. पोलीस सध्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस