बालिका वधू फेम माही विजच्या कूकला अटक, दिली होती जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 20:37 IST2022-07-02T20:30:42+5:302022-07-02T20:37:58+5:30
Crime News : माही विज हिच्या घरी संतोष यादव हा स्वयंपाकीचं काम करत होता.

बालिका वधू फेम माही विजच्या कूकला अटक, दिली होती जीवे मारण्याची धमकी
मुंबई : टीव्ही अभिनेता असलेला जय भानुशाली आणि माही विज यांच्या घरी काम करणाऱ्या कूकला पोलीसांनी अटक केली आहे. या दोघींना आणि त्यांच्या दोन वर्षाची मुलगी ताराला या कूकने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या दोघांनी त्या कूकच्या विरोधात ओशिवरा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. संतोष यादव असं कूकचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
माही विज हिच्या घरी संतोष यादव हा स्वयंपाकीचं काम करत होता. या दोघांमध्ये पगारावरुन वाद झाल्यानंतर संतोष यादवने तिला आणि तिचा पती जय तसेच दोन वर्षाची मुलगी तारा हिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माही विजने या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला बुधवारी अटक केली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "अभिनेत्याने ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधला होता आणि नंतर ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. आरोपीवर कलम ५०९ , ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 जून रोजी संध्याकाळी आयपीसीच्या कलमानुसार पोलिसांनी त्याला त्याच दिवशी अटक केली आणि 30 जून रोजी त्याला अंधेरी महानगर न्यायालयात हजर केले.