दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणं पडलं महागात; पोलिसांनी गुंडांची काढली धिंड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 19:42 IST2022-02-12T19:42:00+5:302022-02-12T19:42:42+5:30
Crime News : नवीन नाशिक येथील शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणं पडलं महागात; पोलिसांनी गुंडांची काढली धिंड!
नाशिक : सिडकोतील शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनांची व दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या चार गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. अंबड पोलिसांनी शुभम पार्क परिसरातून या गुंडांची धिंड काढली.
नवीन नाशिक येथील शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. वैभव रणजित लोखंडे, वैभव गजानन खिरकाडे, अविनाश शिवाजी गायकवाड, केतन गणेश भावसार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. या चौघांनी एका अल्पवयीन मुलासह शुभम पार्क परिसरामध्ये कोयत्याच्या जोरावर धुमाकूळ घालत चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. तसेच नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या पाणीपुरीच्या गाडीच्या देखील काचा फोडल्या होत्या.
नाशिक : दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंडhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/kG61IzVxiZ
— Lokmat (@lokmat) February 12, 2022
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर यातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर उर्वरित चार आरोपींची परिसरात दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना शुभम पार्क व ज्या परिसरामध्ये त्यांनी गाड्यांची तोडफोड व दुकानाचे नुकसान केले होते, त्या परिसरातून फिरवत धिंड काढली.
दरम्यान, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी सांगितले की, एकूणच पोलिसांनी आता आरोपींच्याविरोधात तडीपारीची कारवाईला सुरवात केली आहे. जेणेकरून इतर गुन्हेगारांवर त्याची वचक बसणार आहे.