पुणे : सदाशिव पेठेत टिळक रोडलगतच्या गल्यातील तरुणावर अॅसिड टाकून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केलेल्या सिद्धराम विजय कलशेट्टी हा त्या संपूर्ण कुटुंबाला संपविण्याच्या इराद्यानेच आल्याचे आढळून आले आहे़. त्याच्याकडील बॅगेत पंच, २ कोयते आणि २ चाकू आढळून आले आहेत़. याप्रकरणी त्याच्या मैत्रिणीने विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. मयत आरोपींविरोधात अॅसिड हल्ला व पोलिसांवर फायरिंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सिद्धराम कलशेट्टी याने सदाशिव पेठेतील स्वप्नगंध अपार्टमेंटसमोर मैत्रिणीबरोबर बोलत उभ्या असलेल्या रोहित खरात याच्या अंगावर अॅसिड टाकले व तो शेजारील आनंदी निवास इमारतीत लपून बसला होता़. त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर इमारतीवरुन डक्टमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली होती़. या संपूर्ण घटनेने पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती़.
कुटुंबियांनाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 15:21 IST
तो मोठे हत्याकांड करण्याच्या इराद्याने आल्याचा पोलिसांना संशय आहे़. मात्र, दारातच रोहित दिसल्याने त्याने त्याच्या अंगावर अॅसिड टाकले़.
कुटुंबियांनाच संपविण्याच्या तयारीने ‘तो’ आला होता
ठळक मुद्देतरुणावरुन अॅसिड टाकून कलशेट्टीने केली आत्महत्या