शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

बापरे! 11.88 कोटींची रोकड अन् 1.93 कोटींच्या दागिन्यांचे घबाड सापडले; 700 कोटींच्या करचोरीने अधिकारी चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 11:18 IST

IT Raids Tax Evasion Worth Rs 700 Crore Revealed : आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 कोटी 88 लाखांची रोख रक्कम तसेच 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिली आहे.

नवी दिल्ली - आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 11 कोटी 88 लाखांची रोकड अन् 1 कोटी 93 लाखांचे घबाड सापडले आहे. तब्बल 700 कोटींच्या करचोरीने अधिकारी देखील चक्रावले आहेत. कोट्य़वधीच्या रक्कमेसह 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच झोप उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने (IT) बुधवारी धाड टाकून केलेल्या कारवाईत 700 कोटींची करचोरी समोर आली असल्याचा दावा केला आहे. आयकर विभागाकडून हैदराबादमधील दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्सवर धाड टाकत कारवाई करण्यात आली. 

आयकर विभागाने केलेल्या कारवाईदरम्यान 11 कोटी 88 लाखांची रोख रक्कम तसेच 1 कोटी 93 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) दिली आहे. कारवाई करण्यात आलेले दोन्ही ग्रुप भूखंड व्यवहार तसंच बांधकाम क्षेत्रात आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, "कारवाईदरम्यान नियमांचं उल्लंघन करणारी अनेक कागदपत्रं, हस्तलिखित पुस्तके, करारनामे ज्यामधून बेनामी व्यवहार झाल्याचं दिसत आहे ती जप्त करण्यात आली आहे. तसेच काही खास सॉफ्टवेअर अॅपमधील आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधील सर्व डेटाही मिळवण्यात आला आहे."

मोठ्या कारवाईतून 700 कोटींची बेहिशोबी मालमत्ता समोर आली असून त्याबाबत अनेक पुरावे हाती लागले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आयकर विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) अण्णाद्रमुकचे  (AIADMK) आमदार आर. चंद्रशेखर यांच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा टाकला आहे. या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. आर. चंद्रशेखर या आमदाराच्या ड्रायव्हरकडे भली मोठी रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे. आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अलगरासामी असं या चालकाचं नाव असून त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यातील मनाप्पराई मतदार संघाचे चंद्रशेखर हे आमदार आहेत.

बापरे! आमदाराच्या ड्रायव्हरकडे सापडलं 1 कोटींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून सर्वांचीच उडाली झोप, घटनेने खळबळ

गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अलगरासामी आर. चंद्रशेखर यांच्याबरोबर काम करतात. आता तिसऱ्यांदा त्यांची AIADMK चा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर यांच्या अन्य दोन साथीदारांच्या घरावरही छापेमारी करण्यात आली आहे. कोविलपट्टी गावातील थंगापंडी आणि मुरुगनंदम या दोघांच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. 500 रुपयांच्या नोटांचे बंडलच्या बंडल सापडले आहेत. निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर तामिळनाडुच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केली जात आहे. आयकर विभागाने याआधी देखील कारवाई केली आहे. 

 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सhyderabad-pcहैदराबादMONEYपैसाIndiaभारतCrime Newsगुन्हेगारी