शहरं
Join us  
Trending Stories
1
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
2
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
3
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
4
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
5
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
6
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
7
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
8
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
9
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
10
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
11
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
12
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
13
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
14
VIRAL : १२वीच्या मुलाने गर्लफ्रेंडवर 'अशी' ठेवली पाळत; पद्धत बघून शेजाऱ्यांनाही बसला मोठा धक्का!
15
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
17
सरवणकरांची सून झाली तेजस्विनी लोणारी! शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत बांधली लग्नगाठ
18
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
19
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
20
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्यांच्या त्रासाने आयटी अभियंत्याचे आयुष्य हिरावले; बांधकाम सुरू असलेल्या स्वतःच्या घरातच जीवनयात्रा संपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 14:08 IST

बंगळुरुमध्ये एका आयटी कर्मचाऱ्याने शेजारच्यांच्या त्रासाला कंटाळून स्वतःला संपवले.

Bengaluru Crime: बंगळुरूमधील नल्लूरहळ्ळी परिसरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. शेजाऱ्यांकडून होणारा असह्य जाच, मालमत्तेच्या वादातून प्रशासनाने पाठवलेली नोटीस आणि कथितपणे केलेली २० लाखांची मागणी पूर्ण करू न शकल्याने एका आयटी अभियंत्याने स्वतःला संपवले. मुरली गोविंदराजु या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याने स्वतःच्याच स्वप्नातील घरात गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर आढळला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

दहा पानी सुसाईड नोट आणि गंभीर आरोप

आत्महत्या करण्यापूर्वी आयटीपीएलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले मुरली यांनी १० पानी सुसाईड नोट लिहिली आहे. या चिठ्ठीत त्यांनी शेजारी कुटुंब आणि  काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेजारी असलेल्या नांबियार कुटुंबाकडून (शशी नांबियार आणि उषा नांबियार) त्यांना सतत त्रास दिला जात होता, तसेच बांधकाम थांबवण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली जात होती, असा दावा त्यांनी केला आहे. मुरली यांच्या आई, लक्ष्मी गोविंदराजु यांनीही तक्रारीत म्हटले की, त्यांच्या मुलाला वारंवार छळले जात होते आणि धमक्या दिल्या जात होत्या. हा आर्थिक आणि मानसिक ताण असह्य झाल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

तणाव, नोटीस आणि अखेरचा दिवस

मुरली यांनी २०१८ मध्ये नांबियार यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून ४०x६० चौरस फुटांचा भूखंड विकत घेतला होता. बांधकाम सुरू होताच त्यांच्यातील संबंध बिघडले. उषा आणि शशी नांबियार यांनी बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचे वारंवार आरोप करून मुरली यांना त्रास देण्यास सुरुवात केली. मुरली यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यावर, उषा यांनी बीबीएमपी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. त्यानंतर अधिकारी वारंवार बांधकामस्थळी येऊन त्यांना त्रास देत असत.

बुधवारी सकाळी या प्रकरणात अधिकाऱ्यांसमोर मुरली यांची हजेरी होती. यापूर्वीच सकाळी ६ वाजताच्या सुमारास मुरली कुटुंबीयांना मी खूप दबावाखाली आहे आणि उषा-शशी त्रास देत आहेत, असे सांगून घरातून बाहेर पडले आणि त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या घरात जीवन संपवले.

पोलिसांनी मुरली यांच्या आईच्या तक्रारीवरून तत्काळ कारवाई करत शेजारी शशी नांबियार (६४) आणि उषा नांबियार (५७) यांना अटक केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर त्यांचा मुलगा वरुण याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, नांबियार दाम्पत्याने २०१८ पासून अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या, ज्यामुळे मुरली यांना बी बीबीएमपी कार्यालये, पोलिस ठाणे आणि स्थानिक न्यायालयांमध्ये चकरा माराव्या लागत होत्या.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांबियार कुटुंब फक्त मुरली यांनाच नाही, तर परिसरातील इतर अनेक रहिवाशांनाही सामाजिक कार्यकर्ते असल्याच्या नावाखाली तक्रारी करून खंडणी मागत होते. पोलिसांनी परिसरातील सर्व पीडित नागरिकांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. दोन लहान मुलींचे वडील असलेल्या या तंत्रज्ञाचा स्वप्नपूर्तीचा प्रवास शेजाऱ्यांच्या छळामुळे दुर्दैवी वळणावर थांबला.

English
हिंदी सारांश
Web Title : Neighbor Harassment Claims Life of IT Engineer in Bengaluru

Web Summary : Bengaluru IT engineer Murali, harassed by neighbors over property dispute and extortion demands, tragically ended his life in his unfinished house. Police arrested the neighbors following a suicide note detailing their alleged actions. They are accused of constant harassment and demanding money to stop construction.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरPoliceपोलिस