शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; मृत्यूपूर्वी इमारतीखाली होते भांडत, कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 21:56 IST

राजस्थानमध्ये एका जोडप्याने एकाच वेळी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jaipur Couple Suicide:राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका खाजगी बँक विमा कंपनीच्या व्यवस्थापकाने आणि त्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचेही मृतदेह त्यांच्या फ्लॅटच्या एका खोलीत आढळले. सुरुवातीला पती-पत्नीने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालं नव्हतं. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे पती-पत्नीने आत्महत्या करण्यासाठी एकाच गळफासाचा वापर केला. जयपूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जयपूरमध्ये खाजगी विमा कंपनीचे व्यवस्थापक धर्मेंद्र चौधरी (४०) आणि त्यांची पत्नी सुमन चौधरी (३६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी दादुदयल नगर येथील राधा राणी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये दोघांचेही मृतदेह आढळले. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही भांडत असल्याचे समोर आलं.

इमारतीच्या पार्किंगच्या सीसीटीव्हीमध्ये धर्मेंद्र गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, तर सुमन त्यांना थांबवत होती. सुमन धर्मेंद्रजवळ जाऊन उभी होती आणि त्याला गाडी सुरू करू देत नव्हती. यानंतर धर्मेंद्रने सुमनला बाजूला ढकलले आणि गाडी मागे घेतली.  पण सुमन त्याला जाऊ देत नव्हती. आणखी एका सीसीटीव्हीमध्ये गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती-पत्नी इमारतीत एकत्र प्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर कोणीही त्यांना पाहिले नाही. या व्हिडिओमध्ये सुमनच्या हातात बॅग होती.

शुक्रवारी, जेव्हा धर्मेंद्र बँकेत गेला नाही आणि त्याने सहकाऱ्यांचे फोन उचलले नाही तेव्हा त्यांच्या एका मित्राला याची माहिती देण्यात आली. मित्राची मुलगी फ्लॅटवर पोहोचली आणि दरवाजा ठोठावला. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दरवाजा ढकलताच तो उघडला. मुलीने धर्मेंद्रचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला, तर सुमनचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांना खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही. त्यामुळे पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले.

सुमन स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती, तर धर्मेंद्र एका खाजगी बँकेच्या विमा युनिटमध्ये व्यवस्थापक होता. दोघांनाही ११ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आहेत. दोघेही त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहतात. दोघेही पूर्वी भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नवीन फ्लॅट खरेदी केला होता. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस