शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कुख्यात प्रीती दासची आता क्राईम ब्रांचकडून झाडाझडती, कारागृहातून घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 9:14 AM

कारागृहातून घेतले ताब्यात : २४ जूनपर्यंत पीसीआर

नागपूर : अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणारी आणि कित्येकांना फसविणारी कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास (वय ३९) हिला आज गुन्हे शाखेच्या पथकाने कारागृहातून  ताब्यात घेतले. न्यायालयात हजर करून तिचा २४ जूनपर्यंत पीसीआर मिळवला. आता पुढचे चार दिवस गुन्हे शाखेचे पथक तिची झाडाझडती घेणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांसोबत सलगी साधून त्यांच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून कुख्यात प्रीती समाजसेवेच्या आड लोकांना ब्लॅकमेल करत होती. तिने चार जणांसोबत कथित लग्न केले आणि त्यांचे संसार देशोधडीला लावले. अशाचप्रकारे अनेकांशी मधुर संबंध प्रस्थापित करून त्यांनाही उध्वस्त केले.

प्रीतीने पोलिस अधिकार्‍यांशी असलेल्या संबंधाचा गैरफायदा घेऊन अनेकांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांनी फसवणूक केली. तर कित्येक लोकांना तिने ब्लॅकमेल केले. तिच्याविरुद्ध पाचपावली. लकडगंज, जरीपटका आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. वाढत्या दबावाखाली तिने पाचपावली पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. मात्र पोलीस चौकशीच्या नावाखाली प्रीती दासला मदत करून तिला वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा जोरदार आरोप झाला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. पाचपावली पोलिसांचा पीसीआर संपल्यानंतर शुक्रवारी तिची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी प्रॉडक्शन वॉरन्टच्या आधारे प्रीती दास हिला आज कारागृहातून ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर करून तिचा २४ जून पर्यंत पीसीआर मिळवला. दोन गुन्ह्याची होणार चौकशी गुन्हे शाखेचे पोलीस प्रीती दासची जरीपटका आणि सीताबर्डी पोलिस ठाण्याचे दाखल असलेल्या गुन्ह्याची चौकशी करणार आहेत. महिला पोलीस निरीक्षकेच्या नावाने एका गरीब वृद्धेकडून प्रितीने २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपाखाली प्रीतीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. तर वर्ध्याच्या एका तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दीड लाख रुपये उकळल्यानंतर त्याला धमकी देऊन फसविन्याच्या आरोपाखाली सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही गुन्ह्यांची चौकशी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर आणि त्यांचे सहकारी करणार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCBIगुन्हा अन्वेषण विभागnagpurनागपूर