शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

अलिशान कारमधून गोव्यातील कुख्यात गुंडाची मडगावात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 20:13 IST

कारमधील अन्य व्यक्ती पोलिसांच्या रडारावर : अन्वर सद्या हुबळीत

ठळक मुद्दे हुबळी पोलीसही सतर्क, गँगवॉरचा भडका उडण्याची पोलिसांना भितीविश्वसनीय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांनी हुबळी पोलिसांशी संपर्क साधून अन्वर याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासही कळविले आहे.अन्वर याच्याविरुध्द तडीपारची प्रक्रिया अजूनही जिल्हयाधिकाऱ्यासमोर प्रलंबीत आहे.

सूरज पवारमडगाव : गोव्यातील कोलवाळच्या तुरुगांतही मौजमस्तीत राहणारा कुख्यात गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याच्या कुरापती पुन्हा एकदा वाढण्याचा धोका असून, कोलवाळच्या तुरुगांतून सुटल्यानंतर अलिशान कारमधून तो आपल्या मित्रांसमवेत मौजेत राज्यातील मडगावात एन्ट्री घेताना एक व्हिडीओ सदया सोशल मिडियावरुन व्हायरल झाला आहे. अन्वर हा आपल्या मूळ गावी कर्नाटकातील हुबळी येथे वास्तवाला असल्याची पक्की खबर स्थानिक पोलिसांना मिळाली आहे. ज्या आरामदायी कारमधून अन्वर कोलवाळ येथून आला त्या कारमध्ये अन्य तिघेजण असून, यातील दोघेजण मडगाव भागातील व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांचा अन्वरशी संबध कसा याचा तपास सदया पोलीस यंत्रणेने सुरु केला आहे. हे व्यावसायिक सध्या पोलिसांच्या रडारावर आहेत. विश्वसनीय पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा पोलिसांनी हुबळी पोलिसांशी संपर्क साधून अन्वर याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासही कळविले आहे.

एका मुलीला कर्नाटकमध्ये पळवून नेउन तिच्यावर गँगरेप केल्याप्रकरणी पोलिसांनी अन्वर याला त्याच्या अन्य साथिदारासमवेत हुबळी येथील शिर्सी मध्ये पकडले होते. जीवाची बाजी लावून अन्वरला पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यानतंर त्याची रवानगी कोलवाळ तुरुंगात करण्यात आली होती. मागच्या आठवडयात अन्वर याला जामीन मिळाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण आठ गुन्हयात त्याला जामीन मिळाला आहे. या जामिनापायी साडेतीन लाखांची हमीही न्यायालयात सादर करण्यात आली आहे. अन्वरकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, त्याला कुणी अर्थसहाय्य केले याचाही तपास सदया पोलीस करु लागले आहेत.

अन्वर शेख हा मागच्या आठवडयात कोलवाळ येथून सुटल्यानंतर त्याचे मित्र त्याला घेउन येण्यासाठी कार घेउन गेले होते. यात एक फार्मासी व्यवसायाशी संबधित आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. या व्यावसायिकांचे अन्वरशी संबध कसे याचा तपास सदया पोलिसांनी लावायला सुरुवात केली आहे. मागच्या शुक्रवारी अन्वर तुरुगांतून सुटला होता. त्यानंतर तो रुमडामळ येथे गेला व तेथे त्याने एक दिवस घालवला व नंतर हुबळीला आपल्या मूळगावी परतला अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. हुबळीला गेला असला तरी तेथे तो जास्त दिवस राहणार नाही व गोव्यात परतेल असे पोलिसांना दाट संशय आहे. गोव्यात तो परतला तर पुन्हा एकदा त्याच्या गुन्हेगारी कृत्ये सुरु होईल व एखादया वेळी गँगवॉरचाही भडका उडू शकतो अशीही भिती पोलिसांना आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी अन्वर व त्याच्या सहकार्याच्या हालचालीवर पाळत ठेवण्यात सुरुवात केली आहे.

साल २0१८ साली मडगाव पोलिसांनी चक्क फिल्मी स्टाईलमध्ये अन्वरला बोर्डा येथे पकडले होते. मडगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला जेरबंद केले होते. मडगाव पोलीस ठाण्यात त्यावेळी अन्वरविरुध्द तीन गुन्हे नोंद झालेले होते. कादर बादशहा याला मोटार ट्रान्सफर प्रकरणी धमकावून खंडणी उकळणे, रॉबीन नावाच्या एका इसमाला धमकाविणे तसेच टायसन प्रुण्ड्रन्सिया या इसमावर हल्ला केल्याप्रकरणी तो त्यावेळी पोलिसांना हवा होता. मडगाव पोलीस त्याच्या पाळतीवर होते. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानतंर अन्वरने बेळगाव येथे पळून जाण्याचा प्लॅन आखला होता. एका कारमधून तो निघाला असता, निरीक्षक नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जीपमधून त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली होती. बोर्डा येथे पोहचल्यानंतर पोलिसांनी त्याला गाडी थांबविण्यास सांगितली असतानाही न जुमानता त्याने आपल्या मोटारीची धडक पोलीस वाहनाला देउन त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी त्याचे हे प्रयत्न हाणून पाडून त्याला नंतर बेडया ठोकल्या होत्या.

 

अन्वर याच्याविरुध्द तडीपारची प्रक्रिया अजूनही जिल्हयाधिकाऱ्यासमोर प्रलंबीत आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी ३५ नामचिन गुडांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करुन तडीपारची शिफारस केलेली आहे. मात्र काही कारणास्तव ही प्रकरणे अजूनही प्रलंबीत असून, त्यात अन्वर शेख याच्या प्रकरणाचाही समावेश असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यां नी दै. लोकमतशी बोलताना दिली.

मडगावात गुंडाच्या अनेक टोळया सक्रीय आहेत. गुन्हेगारी जगताता आपले वर्चस्व ठेवण्यासाठी या टोळया एकमेकांवर कुरघोडी करीत असतात. मोतीडोंगर येथील सराईत गुन्हेगार अन्वर शेख उर्फ चोर अन्वर याचे अन्वर शेख उर्फ टायगर याच्याशी वैमनस्य होते. मात्र चोर अन्वर याचा याच वर्षी मोतीडोंगर येथे खून झाला.

अन्वर उर्फ टायगर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद आहे. याशिवाय कर्नाटकातही एका गुन्हयात त्याला शिक्षा झाली होती. ही शिक्षा भोगून गोव्यात परत आल्यानंतर गोव्यात गुन्हेगारीत तो पुन्हा एकदा सक्रीय झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा तर होणार नाही ना ही भिती पोलिसांना आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्या लोकांवर हत्या केल्याचा आरोप

 

कंटेनरच्या कंटेनर चोरणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद 

 

काश्मीरमध्ये लष्कराच्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, जवान जखमी

 

Sushant Singh Rajput Suicide : नवं वळण! पाटणा पोलिसांविरोधात FIR दाखल करण्यासाठी मुंबईत तक्रार दाखल

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सांताक्रूज टोळी युद्ध प्रकरण, गँगस्टर जेनिटो कार्दोज पोलिसांना शरण

टॅग्स :Policeपोलिसgoaगोवाcarकारjailतुरुंगbusinessव्यवसाय