दरोडा, जबरी चोरीतील कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:50 IST2018-09-05T14:49:38+5:302018-09-05T14:50:36+5:30

बुलडाणा : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरीतील फरार कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मोठ्या शिताफीने अटक केली. 

infamous criminals of theft arested in buldhana | दरोडा, जबरी चोरीतील कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

दरोडा, जबरी चोरीतील कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात


बुलडाणा : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरीतील फरार कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मोठ्या शिताफीने अटक केली. 
नांदेड जिल्ह्यातील खडकी बाजार येथील मूळ रहिवासी असलेला कुख्यात गुन्हेगार पर्वतराव उर्फ दीपक तुकाराम शिंगाडे उर्फ शिंदे उर्फ पवार (वय ३३) याच्याविरुद्ध जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. त्याचा हल्ली मुक्काम जालना जिल्ह्यातील शेवली पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या अचानक तांडा आहे. दरम्यान तो शेवली शिवारात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. शेवली शिवारातील जंगलात पाठलाग करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कार्यवाहीसाठी सिंदखेडराजा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, पोलिस उपनिरीक्षक मुकूंद देशमुख, पोलिस हेड कॉन्स्टेबल अताउल्लाखान, विलास काकड, गजानन दराडे, पंकजकूमार मेहेर, संदीप मोरे, युवराज मुळे, श्रीकांत चिंचोले, गजानन जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: infamous criminals of theft arested in buldhana