बंद फॅक्टरीतून ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 06:42 PM2020-10-21T18:42:46+5:302020-10-21T18:46:15+5:30

रांजणगाव येथील बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करून मुंबई मार्गे देशभरात पुरविले जात असल्याचे समोर

The ‘industry’ of drug production from closed factories; Pimpri-Chinchwad police have big connections in hand | बंद फॅक्टरीतून ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे 

बंद फॅक्टरीतून ड्रग्ज निर्मितीचा ‘उद्योग’; पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे 

Next
ठळक मुद्देड्रग्ज विक्रीतून आलेले ८५ लाखांची रोकड जप्त या प्रकरणात पुन्हा मुंबई कनेक्शन उघडकीस

पिंपरी : अमली पदार्थांची निर्मिती कुठे आणि कशी होते, याचा तपास करीत असताना पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत. रांजणगाव येथील बंद फॅक्टरीत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करून मुंबई मार्गे देशभरात ते पुरविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा मुंबई कनेक्शन उघडकीस आले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेला आरोपी अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंदगीर गोसावी यांनी डिसेंबर २०१९ मध्ये तुषार सूर्यकांत काळे, किरण राजगुरू, कुलदीप इंदलकर, ऋषिकेश मिश्रा, जुबेर मुल्ला यांच्या मदतीने रांजणगाव एमआयडीसीमधील संयोग बायोटेक लिमिटेड या बंद कंपनीत सुमारे १३२ किलो एमडी ड्रग्ज बनवले होते. त्यातील ११२ किलो ड्रग्ज तुषार काळे याने नायगाव वसई येथील झुबी उडोको नावाच्या नायजेरियन आरोपीला विकले होते. राहिलेले २० किलो ड्रग्ज विक्रीसाठी जाताना अक्षय काळे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर सापळा लाऊन अटक केली.

किरण काळे हा रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीत संचालक आहे. त्याने अक्षय काळे, चेतन दंडवते, आनंद गिरी गोसावी, किरण राजगुरू व तुषार काळे यांना अशोक सपकाळ यांची बंद पडलेली कंपनी ड्रग्जसाठी उपलब्ध करून दिली. एक किलो ड्रग्ज बनवण्यासाठी ६० हजार रुपये दर ठरवला. तुषार काळे याने त्या बदल्यात ६७ लाख रुपये दिले. मोठा आर्थिक व्यवहार झाल्याने पोलिसांनी आरोपींची बँक खाती फ्रीज केली आहेत. तुषार काळे याला राकेश खानिवडेकर याने ड्रग्ज बनवणे, विकणे आणि पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली. राकेश याला यापूर्वी डीआरआयच्या अधिका-यांनी पालघर येथील कंपनीत अमली पदार्थ बनवण्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

ड्रग्ज विक्रीच्या पैशांतून घेतली दोन एकर शेतजमीन
ड्रग्ज विक्रीतून आलेले ८५ लाखांची रोकड तुषार काळे आणि राकेश खानिवडेकर यांच्याकडून जप्त केली आहे. तुषार काळे याने स्वत:ची कंपनी सुरू करण्यासाठी पालसाई, ता. वाडा, जि. पालघर येथे ७५ लाखांची दोन एकर शेतजमीन घेतली असून ती मालमत्ता ताब्यात घेण्यात येणार आहे. तुषार आणि राकेश यांनी आणखी तीन ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात २० कोटी ९० लाख २३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: The ‘industry’ of drug production from closed factories; Pimpri-Chinchwad police have big connections in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.