Indore Love Jihad: जिम ट्रेनरने नाव बदलून केलं लग्न, प्रेग्नन्सीनंतर तरूणी डॉक्टरकडे गेली तेव्हा झाला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 16:14 IST2021-04-05T16:12:12+5:302021-04-05T16:14:24+5:30
Indore Love Jihad : सध्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वर्षभर त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलं होतं.

Indore Love Jihad: जिम ट्रेनरने नाव बदलून केलं लग्न, प्रेग्नन्सीनंतर तरूणी डॉक्टरकडे गेली तेव्हा झाला खुलासा!
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये(Indore) लव्ह जिहादशी )Indore Love Jihad)) संबंधित एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका मुस्लिम तरूणाने आपलं नाव बदलून आधी तरूणीसोबत मैत्री केली आणि नंतर खोटं बोलून तिच्याशी लग्न केलं. सध्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वर्षभर त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलं होतं. तो मुस्लिम असल्याचा खुलासा हॉस्टिलमध्ये झाला.
खोटं नाव सांगून केलं होतं लग्न
ही घटना इंदुरच्या द्वारकापुरी भागातील आहे. इथे राहणाऱ्या तरूणीची भेट एका जिम ट्रेनरसोबत एका पार्टीमद्ये भेट झाली होती. त्यावेळी त्याने तिला त्याचं नाव गब्बर असल्याचं सांगितलं होतं आणि दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. तोपर्यंत तरूणीला माहीत नव्हतं की, तरूण मुस्लिम आहे. (हे पण वाचा : महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!)
कसा झाला खुलासा?
नुकतीच तरूणीची तब्येत बिघडली होती आणि आपलं अल्ट्रासाउंड करण्यासाठी गेली तेव्हा अल्ट्रा साउंड संचालकाने तिला तिच्या पतीचं आधार कार्ड मागितलं. जेव्हा आरोपी तरूणाने आपलं आधार कार्ड दिलं तेव्हा तिला समजलं की, आपला नवरा मुस्लिम आहे. तेव्हा तिला समजलं की, तरूणाचं नाव मुस्तफा आहे आणि त्याने नाव बदलून तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तरूणीने पोलिसात जाऊन तक्रार दिली.
सध्या तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहे. घटनचे माहिती मिळाल्यावर हिंदू संघटनेचे कार्यकर्तेही पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तिथे त्यांनी गोंधळ घातला.