Indore Fire: इंदौरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग लागली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 8 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 08:37 IST2022-05-07T08:34:26+5:302022-05-07T08:37:50+5:30

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विजय नगरच्या स्वर्णबाग नगरमध्ये ही घटना घडली आहे. रात्री अचानक इमारतीतून धूर निघू लागला.

Indore Fire: A huge fire broke out in a three storey building in Indore; 7 killed, 8 injured | Indore Fire: इंदौरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग लागली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 8 जखमी

Indore Fire: इंदौरमध्ये तीन मजली इमारतीला भीषण आग लागली; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 8 जखमी

इंदौरमध्ये शुक्रवारी रात्री एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. यामध्ये मोठी जिवितहानी झाली आहे. या इमारतीत राहणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ८ जण गंभीररित्या भाजले आहेत. सर्व जखमींना एमवाय हॉस्पटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विजय नगरच्या स्वर्णबाग नगरमध्ये ही घटना घडली आहे. रात्री अचानक इमारतीतून धूर निघू लागला. लोकांना काही समजण्याच्या आत आगीने रौद्ररुप धारण केले. शेजारच्या लोकांनी याची माहिती फायर ब्रिगेडला दिली. जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळविले,परंतू तोवर खूप उशीर झाला होता.  इमारतीतील ७ जणांचा मृत्यू झाला होता. 



 

आगीची सूचना मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले. त्यांनी आगीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. आग लागल्याचे समजताच आजुबाजुच्या घरांतील लोक रस्त्यावर आले होते. आगीमुळे शेजाऱ्यांना कोणते नुकसान झालेले नाही. 
 

Web Title: Indore Fire: A huge fire broke out in a three storey building in Indore; 7 killed, 8 injured