इंदौरमध्ये हत्येचा थरार! मित्राचा बर्थडे साजरा करायला गेलेल्या तरुणाला भर बाजारात चाकूने भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:31 IST2025-10-09T19:28:45+5:302025-10-09T19:31:25+5:30
मध्य प्रदेशात क्षुल्लक वादातून एका तरुणाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

इंदौरमध्ये हत्येचा थरार! मित्राचा बर्थडे साजरा करायला गेलेल्या तरुणाला भर बाजारात चाकूने भोसकले
MP Crime: मध्य प्रदेशात हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदौरच्या उच्चभ्रू विजयनगर परिसरात बुधवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या किरकोळ वादात एका तरुणाचा मृत्यू झाला. २५ वर्षीय पार्थ दिवाणची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार तिथल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
पार्थ त्याच्या मित्रांसह एका हॉटेलध्ये वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. पार्टी संपल्यानंतर, पार्थ निघण्याच्या वाट पाहत असलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की पार्थ जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना हॉटेलच्या बाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये हल्लेखोर हल्ला करत असल्याचे आणि जवळपासचे लोक घाबरून पळून जाताना दिसत आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.
पार्थ त्याच्या मित्र चिरागच्या वाढदिवसाच्या पार्टीला चार-पाच मित्रांसह स्कीम नंबर ५४ मधील वाइन शॉपच्या बाहेर असलेल्या बेकायदेशीर हॉटेलात दारू पिण्यासाठी गेला होता. यादरम्यान, त्याचे तिथे ओळखीच्या काही तरुणांशी भांडण झाले. दोन्ही बाजूंमध्ये वाद झाल्यानंतर, हल्लेखोरांनी बदला घेण्याचे ठरवले. रात्री ८ वाजताच्या सुमारास, तीन हल्लेखोर अॅक्टिव्हावर आले आणि त्यांनी पार्थवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सुमारे ५० मीटर अंतरावर गेल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्या छातीत वार केले.
पार्थच्या साथीदारांनी जखमींना तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर विजय नगर एसीपी आणि स्टेशन प्रभारी सीके पटेल पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि आरोपींना अटक केली. बुधवारी दुपारी हिरानगरमध्ये पार्थचा काही लोकांशी वाद झाला. दोन्ही बाजूचे लोक समोरासमोर आले आणि हाणामारी झाली. मात्र काही वेळाने परिस्थिती निवळली. मात्र दुसऱ्या गटाच्या लोकांना सूड घेण्याचे ठरवले. संध्याकाळी पार्थ त्याच्या मित्राच्या मित्रांसह वाईन शॉपवर येताच त्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.
दरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या घटनेनंतर आरोपी लविशला अटक केली आहे. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार ही घटना जुन्या वादातून घडल्याचे दिसून येत आहे. इतर गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितले.