भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:24 IST2025-09-03T13:13:30+5:302025-09-03T13:24:16+5:30

हरियाणाचा कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादली याला कंबोडियातून भारतात आणण्यात आले आहे.

India's 'most wanted' gangster Badli finally in police custody! Will be brought to India from Cambodia | भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात

भारताचा 'मोस्ट वॉन्टेड' गँगस्टर बादली अखेर पोलिसांच्या ताब्यात! कंबोडियावरून आणले भारतात

हरियाणाचा कुख्यात आणि मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादली याला कंबोडियातून भारतात आणण्यात आले आहे. हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने त्याला कंबोडियात अटक करून भारतात परत आणण्याची यशस्वी कारवाई केली. मनपाल बादलीवर ७ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. या अटकेमुळे हरियाणा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी मोस्ट वॉन्टेड गुंड मनपाल बादलीला कंबोडियात ताब्यात घेण्यात आले होते.

२९ ऑगस्ट २०१८ रोजी मनपाल बादली तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर तो परदेशात गेला आणि त्याची टोळी चालवत होता. मनपालवर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तुरुंगात असतानाही मनपालवर खून केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला मनपाल ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम शिकत होता, परंतु २००० मध्ये त्याच्या काकांच्या हत्येनंतर तो गुन्हेगारीच्या जगात आला. मनपाल बादली हा हरियाणा पोलिसांच्या यादीत नंबर-१ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे.

मनपाल बादलीचा गुन्हेगारी इतिहास काय?
२००० मध्ये त्याच्या काकांची हत्या झाल्यानंतर मनपाल बादली अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी झाला. यामध्ये खून, खंडणी आणि तुरुंगातून गुन्हा करण्याचा कट रचणे यासारखे गंभीर आरोप आहेत. कंबोडियातून मनपाल बादलीला पकडण्यासाठी पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी एक गुप्त अटक मोहीम राबवली.

मनपालच्या अटकेमुळे हरियाणामध्ये संघटित गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते. पोलीस आणि गुप्तचर संस्था मनपालच्या टोळीतील इतर सदस्यांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी कंबोडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांचे सहकार्य घेण्यात आले. त्यानंतरच मनपालला अटक करता आली. मनपाल भारतात आल्यानंतर त्याच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे होण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे संघटित गुन्हेगारीविरुद्धचा लढा आणखी बळकट होईल.

Web Title: India's 'most wanted' gangster Badli finally in police custody! Will be brought to India from Cambodia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.