Indian Navy sailor commits suicide on INS Betwa | खळबळजनक! भारतीय नौदलाचा जवानाने आयएनएस बेतवावर केली आत्महत्या

खळबळजनक! भारतीय नौदलाचा जवानाने आयएनएस बेतवावर केली आत्महत्या

ठळक मुद्दे२२ वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे, तो मूळचा जोधपूर गावचा आहे. तो मुंबईमध्ये आयएनएस बेतवावर तैनात होता.

मुंबई - भारतीय नौदलाच्या एका जवानाने आत्महत्या केली आहे. २२ वर्षीय रमेश चौधरी असं या जवानाचं नाव आहे, तो मूळचा जोधपूर गावचा आहे. तो मुंबईमध्ये आयएनएस बेतवावर तैनात होता. रविवारी सकाळी त्याने आपल्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. जहाजावर त्याचा मृतदेह मिळाला, त्याचंशेजारी ती सर्व्हिस रायफल सापडली. 

रमेश अविवाहित आणि नुकतीच सुट्टी संपवून तो परत आला होता. त्याच्या कुटुंबात आईवडील आणि बहीण आहे. मुंबई पोलीस नौसेनेसोबत या प्रकारबी तपास करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप उघड झालेले नाही. आयएनएस बेतवा मिसाईल फ्रिगेट श्रेणी नौका आहे. नौकेचे नाव बतवा नदीवरून ठेवले आहे. 

 भारतीय सैन्यात आत्महत्या झाल्याची घटना समोर आल्या आहेत, मात्र नौसेनेत अशा कमी घटना समोर आल्या आहेत.  आयएनएस शिवालिकवर देखील २४ वर्षीय जवानाने स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होत्या. 

Web Title: Indian Navy sailor commits suicide on INS Betwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.