भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 04:22 PM2019-08-22T16:22:54+5:302019-08-22T16:24:53+5:30

भा. दं. वि. कलम ५०६ (२), ५०७ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट १९३२ कलम ७ अन्वये गुन्हा एटीएसने दाखल केला

Indian cricket team player threatens to kill; mail got to BCCI | भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी 

भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी 

Next
ठळक मुद्देआरोपीला जेरबंद करण्यास एटीएसचे पथक आसाम येथे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ दहशतवाद विरोधी पथका एटीएसकडून गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

मुंबई - बीसीसीआयच्या कार्यालयीन ईमेल आयडीवर १६ ऑगस्टला भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंना जीवे मारण्याची धमकी देणारा मेल प्राप्त झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ दहशतवाद विरोधी पथका एटीएसकडून गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. भा. दं. वि. कलम ५०६ (२), ५०७ सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट १९३२ कलम ७ अन्वये गुन्हा एटीएसने दाखल केला असून मेल पाठविणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यास एटीएसचे पथक आसाम येथे रवाना झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

या गुन्ह्याचा तपास करताना एटीएसला बीसीसीआयला धमकीचा मेल हा ब्रज मोहन दास याने पाठविला असल्याचे उघड झाले. आसाममधील मोरगाव जिल्ह्यातील शांतीपूर येथे दास हा राहत असून त्याला ताब्यात घेण्यासाठी एटीएसचे पथक आसामला गेले होते असल्याची माहिती पोलीस अधिकारी विनयकुमार राठोड यांनी दिली. एटीएसच्या पथकाने पठाण आसाम पोलिसांच्या मदतीने या संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला २० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या वेळी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. आसाम येथील न्यायालयात आरोपीस हजर करून ट्रान्झिट रिमांड घेण्यात आला. त्यानंतर आरोपीस पुढील रिमांडसाठी मुंबईतील माझगाव येथील मुख्य महानगर दंडाधिकारी येथे हजर करण्यात होते. त्यावेळी दास या आरोपीला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Web Title: Indian cricket team player threatens to kill; mail got to BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.