Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 06:04 PM2019-02-26T18:04:35+5:302019-02-26T18:09:30+5:30

खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. 

Indian Air Strike on Pakistan: Mumbai on High Alert! 7 High alert for states | Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

Indian Air Strike on Pakistan: मुंबई हाय अलर्टवर!; ७ राज्यांना सतर्कतेचा इशारा 

googlenewsNext
ठळक मुद्दे आज सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बँगलोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईभारतीय हवाई दलाने काल मध्यरात्री नियंत्रण रेषा (LOC)ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. पुलवामातील हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारली होती. या हल्ल्याच्या सुत्रधारांचा भारतीय लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी 100 तासांमध्ये खात्मा केला. मात्र, आपल्या 40 जवानांचे प्राण घेणाऱ्या पाकिस्तानला अद्दल घडवा, अशी मागणी जोर धरत होती. यानंतर आज सकाळी हवाई दलाच्या यशस्वी कारवाईची माहिती समोर आली. या कारवाईमुळे पाकिस्तान भारतात घातपात घडविण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. प्रामुख्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह सात राज्यांत हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळेच खासकरून मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरील गस्त वाढवली आहे. 

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेत भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी मध्यरात्री तीन ते साडेतीन दरम्यान बालाकोट, मुझ्झफराबाद, चिकोटीवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदच्या दृष्टीने यातील बालाकोटचं महत्त्व फार मोठं आहे. जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरची कंदहार प्रकरण घडलं. त्यावेळी भारताला अजहरची सुटका करावी लागली. त्यानंतर अजहरने त्याचा मोठा तळ बालाकोटमध्ये उभारला. भारतीय हवाई दलाने याच तळाला लक्ष्य करत जैशला मोठा दणका दिला.  भारताने LOC ओलांडून १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदा पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या हल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने भारतातील सर्व महत्वाच्या शहरांना आणि राज्यांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच मुंबईतील रेल्वे, विमानतळ आणि शहरातील महत्वाच्या स्थळांवरील गस्त वाढवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बँगलोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताने केलेल्या या हल्ल्याला पाकिस्तानकडूनही प्रतिउत्तर मिळू शकते. त्यामुळे देशातील सर्व शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलला दहशतवाद्यांनी नेहमी लक्ष्य केलं आहे. या पूर्वीही पकडण्यात आलेल्या संशयितांकडून लोकल आणि एक्सप्रेसमध्ये स्फोट घडवून आणण्याचे कट उधळवले आहेत. त्यामुळे लोकलच्या प्रत्येक स्थानकावर गस्त वाढवली आहे. सीसीटिव्हीच्या नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जात आहे. तसेच मुंबईत प्रवेश करणाऱ्या चारही एंट्री पाॅईंटवर गस्त वाढवण्यात आली आहे. शहराला लागून असलेल्या समुद्रातील ९४ लँडीग पाॅईंटवरही पोलिसांनी गस्त वाढवली आहे.त्याचप्रमाणे विमानतळावरील सुरक्षेतही वाढ केली आहे. 

Web Title: Indian Air Strike on Pakistan: Mumbai on High Alert! 7 High alert for states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.