शहरं
Join us  
Trending Stories
1
थायलंडमध्ये चालत्या ट्रेनवर कोसळली अवाढव्य क्रेन; २२ प्रवाशांचा मृत्यू, चिनी बनावटीचा हायस्पीड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात
2
पंतप्रधान कार्यालयाला तक्रार, पत्र पाठवायचेय? आजपासून पत्ता बदलला, संक्रांतीच्या मुहूर्तावर नव्या जागेत स्थलांतर...
3
बीसीसीएल आयपीओ अलॉटमेंट आज, तुम्हाला मिळालाय का शेअर; GMP किती? जाणून घ्या
4
विधवा सुनेला पोटगी...! सर्वोच्च न्यायालयाकडून मनुस्मृतीचा दाखला, सासऱ्याचे झालेले पतीच्या आधी निधन...
5
चमत्कार...! ISRO चं मिशन फेल झालं, पण १६ पैकी एक सॅटेलाईट जिवंत वाचला! अवकाशातून पाठवला सिग्नल
6
इस्त्रायलचा पुढचा निशाणा पाकिस्तान? 'त्या' दाव्याने इम्रान खान-शहबाज शरीफ यांची झोप उडाली!
7
Stock Market Today: शेअर बाजारात कमकुवत सुरुवात, निफ्टीमध्ये ८४ अंकांची घसरण; 'हे' शेअर्स आपटले
8
WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय
9
२०२६ मध्ये माघी गणपती कधी? पाहा, श्री गणेश जयंती तारीख, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
10
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन
11
२०२६चा पहिला प्रदोष शिवरात्रि योग: ‘असे’ करा शिव व्रत, पूजेत ‘या’ वस्तू हव्याच; पाहा, मान्यता
12
लग्नानंतर २० दिवसांतच नात्याला काळिमा! दिराचाच नववधूवर वाईट डोळा, सासूनेही दिली साथ; पती तर म्हणाला..
13
२०२६चे पहिले सूर्य गोचर: १ उपाय, १ महिना लाभ; सरकारी कामात यश-लाभ, पैसा येईल, पण उधारी टाळा!
14
बेंगळुरू-पॅरिस विमानाचे तुर्कमेनिस्तानात आणीबाणीचे लँडिंग! हवेतच इंजिन निकामी झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला
15
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
16
प्रचाराच्या रणधुमाळीत 'परश्या'ची एन्ट्री; काँग्रेसच्या उमेदवारासाठी मैदानात उतरला आकाश ठोसर
17
TATA च्या 'या' कंपनीत पुन्हा मोठा 'सायलेंट कट'; Q3 मध्ये ११ हजार जणांची कपात, दोन तिमाहीत ३० हजार जणांची गेली नोकरी
18
झाले आता TVS iCube ही पेटली! ते पण आपल्या कोल्हापुरात; एकटी ओला उगाच बदनाम झाली...
19
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
20
WPL 2026: अरे देवा!! इतिहासात पहिल्यांदाच घडले; डेब्यू मॅचमध्येच आयुषी सोनी 'रिटायर्ड आऊट'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत वाढले बलात्कार, विनयभंग आणि दंगली; प्रजा फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 20:26 IST

गेल्या काही वर्षात मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि दंगली यांसारख्या अत्यंत गंभीर घटनांमध्ये वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देप्रजा फाऊंडेशनच्या या अहवालावरून मुंबईतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून शासकीय - प्रशासकीय पातळीवरही निराशेचं वातावरण आहे. 2015-16 ते 2017-18 या आर्थिक वर्षात लैंगिक गुन्ह्यांपासून बालक संरक्षण अधिनियम (पॉक्सो) या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 19 % वाढ झाली. 

मुंबई - मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर सवाल निर्माण करणारा खळबळजनक अहवाल प्रजा फाऊंडेशनने जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत बलात्कार, विनयभंग आणि दंगली यांसारख्या अत्यंत गंभीर घटनांमध्ये वाढ झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

2013 -14 ते 2017- 18 पर्यंतच्या अहवालानुसार, बलात्कार, विनयभंग आणि दंगलींसारख्या गुन्ह्यात अनुक्रमे 83%, 95%, 36% वाढ झाली. 2015-16 ते 2017-18 या आर्थिक वर्षात लैंगिक गुन्ह्यांपासून बालक संरक्षण अधिनियम (पॉक्सो) या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 19 % वाढ झाली. 2015- 16 मध्ये एकूण 891 पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले, तर हेच प्रमाण 2017-18 याच तक्रारींचे प्रमाण 1062 इतके नोंदविले आहे. जुलै 2018 पर्यंत मुंबई पोलीस दलात 22% कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तर 32% लोकांना पोलीस आणि कायदेशीर यंत्रणेवर विश्वासच नाही, म्हणून त्यांनी पोलिसांना आपल्याबद्दल घडलेल्या गुन्ह्याबाबत माहितीच दिली नाही. 23% लोकांच्या मते, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे एक वेदनादायक गोष्ट आहे. गुन्हा घडताना पाहिलं, मात्र तरीही पोलिसांना माहिती न देणाऱ्यांची संख्या 25% आहे. कारण ते पोलिसांच्या चौकशीत अडकू इच्छित नव्हते. प्रजा फाऊंडेशनच्या या अहवालावरून मुंबईतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक असून शासकीय - प्रशासकीय पातळीवरही निराशेचं वातावरण आहे. त्यामुळे याचा पोलीस यंत्रणेसह राज्याच्या गृहविभागाला गांभिर्याने विचार करावा लागणार आहे. 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारMolestationविनयभंगPoliceपोलिस