प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:26 IST2025-11-11T15:25:44+5:302025-11-11T15:26:04+5:30
मनीष कृतिकाशी बोलायचा प्रयत्न करत होता. परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर ९ तारखेला त्याने कृतिका भेटायला बोलवले आणि तिच्यावर गोळी झाडली.

प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
२२ वर्षीय कृतिका चौबे सध्या भोपाळच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ७ वर्षापूर्वी ज्या युवकाच्या प्रेमात ती बुडाली होती, तोच एक दिवस तिला गोळी मारेल याचा विचारही कृतिकाने केला नसेल. बुंदेलखंड यूनिवर्सिटीजवळ मनीष साहू या प्रियकराने आधी प्रेयसी कृतिकाला गोळी मारली त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडली. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला तर युवतीचा प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
सर्वात हैराण करणारे म्हणजे हा गोळीबार ९ नोव्हेंबरच्या दिवशी झाली, हा तोच दिवस होता जेव्हा ७ वर्षापूर्वी ललितपूर येथे राहणारी कृतिका आणि मनीष यांच्यात प्रेम संबंध सुरू झाले होते. आता ७ वर्षांनी यांच्या प्रेमाचा शेवट गोळीबाराने झाला आहे. मनीषचं लग्न त्याच्या कुटुंबाने केले होते. मात्र तो कृतिका विसरू शकत नव्हता. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या २ महिन्यांनी त्याने पत्नीला सोडले आणि घरातून बाहेर पडला. कुटुंबानेही मनीषशी संबंध तोडून टाकले. मनीषच्या लग्नानंतर कृतिकाने त्याच्याशी दूर होणे पसंत केले. परंतु मनीषला ते आवडले नाही. कृतिकाने याच वर्षी बुंदेलखंड यूनिवर्सिटीत प्रवेश घेतला होता. ती पहिल्या वर्षाला होती. मनीष कृतिकाशी बोलायचा प्रयत्न करत होता. परंतु ती ऐकण्यास तयार नव्हती. अखेर ९ तारखेला त्याने कृतिका भेटायला बोलवले आणि तिच्यावर गोळी झाडली.
आधी खायला दिले मग गोळी झाडली
मनीषने युवतीला भेटल्यानंतर खायला दिले, त्यानंतर दोघे बोलत होते. दोघेही बोलता बोलता यूनिवर्सिटीजवळ आले, तेव्हा कृतिका तिच्या हॉस्टेलमध्ये जात होती. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. मनीषने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु कृतिकाला काही कळायच्या आधीच त्याने बंदूक काढली आणि तिला गोळी मारली. त्यानंतर स्वत:वरही तिने गोळी झाडली.
कशी झाली होती भेट?
मनीष साहू आणि कृतिका तालाबपूरा परिसरात राहायला होते. २०१८ साली या दोघांची पहिली भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की, एकमेकांसोबत जगण्या मरण्याचं वचन दिले. त्यात कौटुंबिक स्थितीमुळे मनीष कामकाजात व्यस्त झाला. सरकारी विभागात तो चालक म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी कुटुंबाने मनीषचे लग्न लावून दिले. मात्र मनीषला ते लग्न मंजूर नव्हते. लग्नाच्या २ महिन्यानंतर मनीषने ते नाते संपवले. त्यानंतर मागील ६ महिन्यापासून तो कुठे होता हे कुणालाही माहिती नव्हते. त्यातच मनीषच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का बसला.