उल्हासनगरात तरुणीचा विनयभंगकरून जाब विचारणाऱ्या कुटुंबालाही मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:14 IST2025-11-21T19:14:08+5:302025-11-21T19:14:44+5:30
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, जाब विचारायला गेलेल्या कुटुंबीयांनाही केली मारहाण

उल्हासनगरात तरुणीचा विनयभंगकरून जाब विचारणाऱ्या कुटुंबालाही मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : कॅम्प नं-१, मधील रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग करून याचा जाब विचारणाऱ्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना उघड झाली. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-१, परिसरात राहणारी एक तरुणी रस्त्यावरून जात असताना अंश करोतीया या तरुणाने तिला ' तू लडका है या लडकी' असे म्हणत डिचविले. तसेच तरुणीचा विनयभंग करून मारहाण केली. याचा जाब विचारायला गेलेल्या कुटुंबीयांनी अंश आणि त्याच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तरुणीच्या कुटुंबानी उल्हासनगर पोलिसाकडे दाद मागून तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी अंश करोतीया याच्यासह कुटुंब सदस्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकाराने खळबळ उडाली असून आरोपीसह कुटुंबावर सक्त कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.