२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:37 IST2025-08-08T16:37:15+5:302025-08-08T16:37:40+5:30

पतीला प्रेयसीसोबत पाहून वंदना संतापली होती. त्यात तिने सगळा राग प्रेयसीवर काढला. प्रेयसीला लाथा बुक्क्यांनी तिने बेदम मारले

In Rewa, Madhya Pradesh, a wife got angry after seeing her husband with his girlfriend and beat her up brutally | २ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

मध्य प्रदेशच्या रिवा इथे पुन्हा एकदा पती-पत्नी आणि ती हे प्रकरण समोर आले आहे. यावेळी एका नेत्याला पत्नीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले आहे. फ्लॅटवर नेता आणि त्याची गर्लफ्रेंड रोमान्स करत होते. त्याचवेळी त्याची पत्नी मुलासह तिथे पोहचली आणि गोंधळ घातला. या गोंधळात संधी साधून नेता ड्रेनेज पाईपच्या आधारे फ्लॅटमधून पळाला परंतु प्रेयसी पत्नीच्या जाळ्यात सापडली. त्यानंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. 

मध्य प्रदेशातील बिछिया परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी पंतप्रधान आवास घरात बुधवारी रात्री ९ वाजता गोंधळ उडाला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये ओबीसी महासभेचे प्रदेश महासचिव पप्पू कनौजिया त्यांच्या प्रेयसीसह होते. त्याचवेळी कनौजिया यांची पत्नी वंदना हिला भनक लागली. वेळ न घालवता ती फ्लॅटवर पोहचली आणि मोठा ड्रामा झाला. पतीला प्रेयसीसोबत पाहून पत्नीचा राग अनावर झाला. तिने प्रेयसीला मारण्यास सुरुवात केली. त्याचाच फायदा घेत पती पप्पू तिथून पळून गेला. 

पतीला प्रेयसीसोबत पाहून वंदना संतापली होती. त्यात तिने सगळा राग प्रेयसीवर काढला. प्रेयसीला लाथा बुक्क्यांनी तिने बेदम मारले. ज्यात प्रेयसी रक्तबंबाळ झाली. या गोंधळामुळे आसपासचे लोक तिथे जमा झाले. घटनास्थळी पोलीसही पोहचले. परंतु तोपर्यंत प्रेयसीला खूप मारहाण झाली. पोलिसांनी नेत्याच्या प्रेयसीला पत्नीच्या तावडीतून सोडले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ वंदनाने बनवला, जो पोलीस आणि मीडियाला देण्यात आला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

२ तास चालला हायव्हॉल्टेज ड्रामा

दरम्यान, जवळपास २ तास हा हायव्हॉल्टेज ड्रामा सुरू होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे वंदना कनौजिया यांनी एक व्हिडिओ जारी करून पतीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या पतीने मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मलाही सातत्याने धमक्या मिळत असून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे मला पोलिसांनी संरक्षण द्यावे आणि पतीवर कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्यांना हिंसक कृत्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. 

Web Title: In Rewa, Madhya Pradesh, a wife got angry after seeing her husband with his girlfriend and beat her up brutally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.