अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 09:52 IST2025-07-26T09:51:49+5:302025-07-26T09:52:14+5:30

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्या कारवाईत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन आरोपींना अटक करण्यात आली.

In odisha, Minor girl gangraped, tried to bury her alive after finding out she was pregnant; 2 arrested, 1 accused absconding | अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार

जगतपूर - ओडिशाच्या जगतपूर जिल्ह्यात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर गँगरेप करण्यात आला आहे. त्यानंतर जेव्हा ही मुलगी प्रेग्नेंट झाली तेव्हा आरोपींनी तिला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेतील ३ आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसरा आरोपी फरार आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहे. 

माहितीनुसार, जगतपूरच्या बनशबारा गावात राहणारे २ भाऊ भाग्यधर दास आणि पंचानन दास यांनी तुलु बाबू नावाच्या सहकाऱ्यासोबत मिळून अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ बलात्कार केला. त्यात ही मुलगी ५ महिन्याची गर्भवती राहिली. जेव्हा आरोपींना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी हे कृत्य लपवण्यासाठी मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार उघड झाल्याने मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले. घटनेतील पीडित मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर स्थानिक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. त्या कारवाईत भाग्यधर दास आणि पंचानन दास या दोन आरोपींना अटक करण्यात आली. तिसरा आरोपी तुलू बाबू हा गाव सोडून पळाला आहे. पोलिस या फरार आरोपीचा शोध घेत आहे. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून फरार आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

आरोपी भावंडे एका आश्रमात काम करत होते, तिथे ही मुलगी कायम येत-जात होती. त्यातून आरोपींनी या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केला. सुरुवातीला स्थानिक पंचायतीसमोर हे प्रकरण आले तेव्हा प्रकार दडपण्यासाठी पीडितेच्या वडिलांना पैशांची ऑफर देण्यात आली त्याशिवाय जर पोलिसात तक्रार केली तर बघच अशी धमकीही देण्यात आली. आरोपीने अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी धमकी दिली. मदतीच्या बहाण्याने त्यांनी एका ठिकाणी मुलीला भेटायला बोलावले आणि तिथे जर तू गर्भपात केला नाही तर जिवंत गाडू अशी धमकी दिली. पीडिता कसंतरी तिथून पळाली आणि वडिलांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. 
 

Web Title: In odisha, Minor girl gangraped, tried to bury her alive after finding out she was pregnant; 2 arrested, 1 accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.