लव्ह ट्रँगलमधूनच ‘त्या’ तरुणीची गोळी झाडून हत्या; भाऊ अन् प्रियकराच्या मदतीने रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 07:51 IST2026-02-12T07:51:33+5:302026-02-12T07:51:33+5:30
घटनेच्या दिवशी दुपारी नदीम तब्बस्सूमच्या घरी असल्याचे समजताच तिने घर गाठले. तेथे तब्बस्सूम व शिफामध्ये भांडण झाले.

लव्ह ट्रँगलमधूनच ‘त्या’ तरुणीची गोळी झाडून हत्या; भाऊ अन् प्रियकराच्या मदतीने रचला कट
मुंबई - प्रेमात अडसर ठरत असतल्याच्या रागातून तब्बसूम मोहम्मद शेख (२५) हिने शिफा शेखवर गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर प्रियकर आणि भावाच्या मदतीने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याचे गोवंडी गोळीबार प्रकरणाच्या तपासात समोर आले.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तब्बसूमसह प्रियकर नदीम ऊर्फ रिजवान शेख (२७), भाऊ साजीद मोहम्मद शेख (२१) आणि कलाम चौधरी यांना अटक केली आहे. तब्बसूमचे नदीमसोबत ५ ते ७ वर्षांपासून वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नदीम हा अभिलेखावरील आरोपी आहे. तो तब्बसूमच्या घरीच राहायचा. ही बाब समजताच तब्बसूमने तिचे घर गाठून नदीमपासून लांब राहा, नाही तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली.
कुटुंबीयांनी याबाबत समजताच ३ महिन्यांपूर्वी शिफाला गावी पाठवले. काही दिवसांनी ती पुन्हा गोवंडीतील कमलारामणनगर येथे राहण्यास आली. घटनेच्या दिवशी दुपारी नदीम तब्बस्सूमच्या घरी असल्याचे समजताच तिने घर गाठले. तेथे तब्बस्सूम व शिफामध्ये भांडण झाले. याच रागात तब्बस्सूमने नदीमच्या देशी कट्ट्याने शिफावर गोळी झाडली. दरम्यान चारही जणांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.