थरारक! हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक लोखंडी रॉडने हल्ला; १ मृत्यू तर अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 09:07 IST2026-03-08T09:06:40+5:302026-03-08T09:07:10+5:30

सर्व जखमींना तातडीने हॉस्टेलजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी ही घटना का घडली याचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

In Karnatak, Students sleeping in hostel suddenly attacked with iron rods; 1 dead, many injured | थरारक! हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक लोखंडी रॉडने हल्ला; १ मृत्यू तर अनेक जखमी

थरारक! हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक लोखंडी रॉडने हल्ला; १ मृत्यू तर अनेक जखमी

बल्लारी - कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी गुरुकुल निवासी शाळेत रात्री उशिरा विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांवर लोखंडी रॉडने हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर ८ विद्यार्थी जखमी आहेत, त्यातील २ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

माहितीनुसार, जेवणानंतर सर्व विद्यार्थी हॉस्टेलमध्ये झोपले होते. त्यावेळी एका मुलाने बेडच्या लोखंडी रॉडने झोपलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, २ गंभीर जखमी झाले. इतर ६ जणांवर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींना तातडीने हॉस्टेलजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेमकी ही घटना का घडली याचा पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दरम्यान, आरोपी विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रांवर हल्ला का केला याचे कारण अद्याप समजलेले नाही. आरोपी विद्यार्थ्याला सध्या ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मात्र या घटनेने शाळेत खळबळ माजली आहे. 

Web Title : हॉस्टल में खौफ: सोते हुए छात्रों पर रॉड से हमला, एक की मौत

Web Summary : कर्नाटक के बल्लारी जिले में एक चौंकाने वाली घटना: एक छात्र ने हॉस्टल में सोते हुए सहपाठियों पर लोहे की रॉड से हमला कर दिया। एक छात्र की मौत हो गई, और आठ घायल हो गए, जिनमें से दो गंभीर हैं। आरोपी को हिरासत में लेने के बाद पुलिस हमले के पीछे के मकसद की जांच कर रही है।

Web Title : Horror in Hostel: Student Attacks Sleeping Classmates with Rod, One Dead

Web Summary : A shocking incident in Karnataka's Bellary district: a student attacked sleeping classmates in a hostel with an iron rod. One student died, and eight were injured, two critically. Police are investigating the motive behind the attack after the accused was taken into custody.