धक्कादायक! ३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:00 IST2025-02-25T08:00:00+5:302025-02-25T08:00:39+5:30

जंगलातून या मुली गावात पोहचल्या आणि त्यांनी आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्व गावकरी पीडित मुलींसह पोलीस स्टेशनला पोहचले

In Jharkhand Khunti District, 3 girls were kidnapped and gang-raped by 18 minors; Villagers are furious | धक्कादायक! ३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

धक्कादायक! ३ मुलींचं अपहरण करून १८ अल्पवयीन मुलांनी केला गँगरेप; गावकरी संतापले

खूंटी - झारखंडच्या खूंटी जिल्ह्यात सामुहिक बलात्काराने खळबळ माजली आहे. याठिकाणी ५ अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलं त्यातील तिघींवर १८ अल्पवयीन मुलांनी गँगरेप केल्याची घटना घडली आहे. अपहरण केलेल्या ५ मुलींपैकी २ जण आरोपींच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाल्या. त्यांनी गावात पोहचवून त्यांच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचले. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

खूंटी येथील पोलीस अधीक्षक अमन कुमार यांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री घडली. ५ मुली रनिया परिसरात एका लग्न समारंभात सहभागी होऊन घरी परतत होत्या. यावेळी काही युवकांनी त्यांचा पाठलाग करत निर्जनस्थळी सर्व मुलींचे अपहरण केले. त्यानंतर जबरदस्तीने या मुलींना डोंगराच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी २ मुलींनी आरोपींच्या हाताला दाताने जोरात चावत त्यांच्या तावडीतून सुटून पळाल्या. या घटनेतील १८ आरोपींनी ३ मुलींसोबत सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर या मुलींना जंगलात सोडून फरार झाले असं त्यांनी सांगितले.

जंगलातून या मुली गावात पोहचल्या आणि त्यांनी आई वडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्व गावकरी पीडित मुलींसह पोलीस स्टेशनला पोहचले. ५ पैकी ३ मुलींचे वय १२-१६ वयोगटातील होते तर आरोपींचे वय १२-१७ वयोगटातील होते. पीडित मुलींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुलींची मेडिकल चाचणी करण्यात आली. पोलिसांनी सर्व आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सोमवारी या सर्वांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या घटनेतील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही खूंटी जिल्ह्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीचं अपहरण करून ६ जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. ही मुलगी शाळेतून घरी परतत होती. त्यावेळी २ बाईकवरून ६ युवकाने तिचा पाठलाग करून जबरदस्तीने उचलून नेले. त्यानंतर जंगलात तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलीने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला परंतु तिच्या तोंडात कापड कोंबण्यात आले. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला शांत करण्यात आले. 

Web Title: In Jharkhand Khunti District, 3 girls were kidnapped and gang-raped by 18 minors; Villagers are furious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.