चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून केला पत्नीचा खून; हत्येनंतर पतीचीही आत्महत्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 21:43 IST2025-06-02T21:43:22+5:302025-06-02T21:43:22+5:30

भाऊ विजय चव्हाणके याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केली,

In Jalgoan Wife strangled to death over suspicion of character; Husband also commits suicide after murder | चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून केला पत्नीचा खून; हत्येनंतर पतीचीही आत्महत्या  

चारित्र्याच्या संशयावरून गळा आवळून केला पत्नीचा खून; हत्येनंतर पतीचीही आत्महत्या  

संजय सोनार 

चाळीसगाव  (जि. जळगाव) : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना हातगाव  ता. चाळीसगाव येथे  सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. 

विजय सुकदेव चव्हाणके (४५) व वर्षा विजय चव्हाणके (४०) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. विजय हा मुले तसेच आईसह हातगाव शिवारात शेतात राहत होता. त्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीशी वाद होत होता.  २ रोजी सकाळी ११:२५ वाजेच्या सुमारास विजय याने मोठा भाऊ अशोक चव्हाणके यांना फोन करून आपण पत्नी वर्षाला संपविले असून, स्वत: सुद्धा बरेवाईट करणार असल्याचे सांगितले.

अशोक चव्हाणके यांनी कुटुंबासह भाऊ विजय व त्याची पत्नी वर्षा यांच्या शोधासाठी शेतात धाव घेतली. त्यावेळी शेतातील आंब्याच्या झाडाला विजय हा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर वर्षा ही शेतातील गुरांच्या चाऱ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्याभोवती सुती दोरी गुंडाळलेली होती.  लहान भाऊ विजय चव्हाणके याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला व स्वतः आत्महत्या केली, अशी  फिर्याद अशोक चव्हाणके यांनी दिली.  त्यावरुन  विजयच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: In Jalgoan Wife strangled to death over suspicion of character; Husband also commits suicide after murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.