शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

​पोलीस प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या; ​३ वर्षांनी घटना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 22:36 IST

विधी संघर्षग्रस्त बालकांसह चौघांना अटक, या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला.

परिमल डोहणे 

​चंद्रपूर : प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची स्वतःच्या कॉन्स्टेबल मुलीनेच कॉन्स्टेबल प्रियकराच्या मदतीने विष देऊन हत्या केल्याची खळबळजनक घटना चंद्रपुरात तब्बल तीन वर्षांनी उघडकीस आली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी एका विधी संघर्षग्रस्त बालकासह चार जणांना अटक केली आहे. 

​जयंत अशोकराव बाल्लावार असे मृत पित्याचे नाव आहे. तर प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (३०, रा. जुना सुमठाणा, भद्रावती), कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार (२२, रा. चंद्रपूर), चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (२२, रा. नवीन सुमठाणा, भद्रावती) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.​आर्याचे आशिष शेडमाके याच्याशी २०१२ पासून प्रेमसंबंध होते. या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला. आशिष शेडमाके याने त्याच्या संघर्षग्रस्त मावसभावाच्या माध्यमातून चैतन्य ऊर्फ मोंटी गेडाम याच्याकडून ५,००० रुपयांत विषाची बाटली विकत घेतली.

​मिल्कशेकधून दिले विष​२४ मार्च २०२३ रोजी आशिषने आर्याला विष आणून दिले. २५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आर्याने वडिलांना मिल्कशेकमध्ये विष मिसळून प्यायला दिले. ते प्यायल्यानंतर जयंत बाल्लावार कर्तव्यावर गेले असता, त्यांना चक्कर येऊन ते खाली पडले. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी चौघांविरुद्ध कलम ३०२, १२०-बी, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. ​घरी न येता सासरी गेल्याने संतापला प्रियकर​जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूच्या एक महिन्यानंतर आशिष व आर्याने प्रेमविवाह केला. जयंत बाल्लावार हे शासकीय नोकरीवर असल्याने आर्याही अनुकंपा तत्त्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाली. पासिंग आऊट परेड झाल्यानंतर आर्या ही घरी परत येणार होती. त्यामुळे त्याने घरी स्वागताचे नियोजन केले होते. मात्र ती परेड झाल्यानंतर सासरी जाण्याऐवजी माहेरी गेली. त्यामुळे आशिष रागावला होता.​न्यायाधीशांच्या परवानगीने आरोपींना अटक​आशिष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असताना त्याची दोन-तीन वादग्रस्त प्रकरणे पुढे आली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. त्याच्या बडतर्फीमागे आर्याचा हात असल्याचा त्याला संशय होता. त्यातच ती पासिंग आऊट परेड होऊन सासरी न येता माहेरी गेल्याने तो संतापला होता. त्यामुळे त्याने २५ मार्चला पोलिसांत तक्रार केली. रात्री महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने ठाणेदार आसिफराजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे, पीएसआय कृष्णा दरडे यांनी न्यायाधीशांच्या रीतसर परवानगी घेऊन सर्वांना अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Constable Daughter Kills Father with Lover's Help; Case Solved After 3 Years

Web Summary : In Chandrapur, a constable daughter and her constable lover murdered her father for opposing their relationship. They poisoned him. The crime, committed three years ago, has now been solved with four arrests, including a minor.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी